Republic First Closed by Regulators and Bought by Fulton Bank  Sakal
Personal Finance

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

Republic First Bank: अमेरिकेत आणखी एक बँक संकटात सापडली आहे. देशाच्या नियामकांनी रिपब्लिक फर्स्ट बँकेचा ताबा घेतला आणि फुल्टन बँकेला विकला. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) शुक्रवारी ही माहिती दिली.

राहुल शेळके

Republic First Bank: अमेरिकेत आणखी एक बँक संकटात सापडली आहे. देशाच्या नियामकांनी रिपब्लिक फर्स्ट बँकेचा ताबा घेतला आणि फुल्टन बँकेला विकला आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) शुक्रवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षी प्रादेशिक बँकिंग संकटामुळे अमेरिकेतील पाच बँका दिवाळखोर झाल्या होत्या.

फुल्टन बँक रिपब्लिक फर्स्ट बँकेच्या सर्व ठेवी घेईल आणि सर्व मालमत्ता खरेदी करेल. 31 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार रिपब्लिक बँकेची एकूण मालमत्ता सहा अब्ज डॉलर्स आणि ठेवी चार अब्ज डॉलर्स होत्या.

रिपब्लिक बँक अमेरिकेच्या प्रमुख प्रादेशिक बँकांमध्ये गणली जात होती. नियामकानुसार, आता रिपब्लिक बँकेच्या शाखा आता फुल्टन बँकेच्या शाखा या नावाने उघडतील. रिपब्लिक बँकेच्या या शाखांची संख्या 32 आहे, ज्या पेनसिल्व्हेनिया व्यतिरिक्त न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क येथे आहेत.

वर्षभरापूर्वी 'या' बँका बंद पडल्या होत्या

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकेच्या तीन प्रादेशिक बँका बँकिंग संकटाला बळी पडल्या होत्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दिवाळखोर झाल्या. त्यानंतर मे महिन्यात फर्स्ट रिपब्लिक बँक बंद झाली. आता वर्षभरानंतर रिपब्लिक बँक संकटामुळे ताब्यात घ्यावी लागली आहे.

गेल्या वर्षी संकट सुरू झाले

यापूर्वी रिपब्लिक बँक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत होती आणि निधी उभारण्यासाठी काही गुंतवणूकदारांशी चर्चा करत होती. वाढत्या खर्चामुळे बँक नफ्याच्या आघाडीवर संघर्ष करत होती. गेल्या वर्षी सुरू झालेल्या संकटानंतर, बँकेचे शेअर्स घसरले. यामुळे बँकेचा एमकॅप 2 दशलक्ष डॉलरच्या खाली घसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: विराट कोहलीमुळे उडाला गोंधळ; Vizag मध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांची दमछाक अन्...

Vladimir Putin Interview : रशियाने खरंच मोदींच्या हत्येचा कट उधळला? 'त्यादिवशी' कारमध्ये काय चर्चा झाली? पडद्यामागची गोष्ट समोर...

Marathi Breaking News LIVE: पुणे विमानतळावर विमान सेवेला मोठा फटका

Putin India visit: पुतीन यांच्या स्वागताला मुंबईचा पांढरा हत्ती! मोदींनी का निवडली टोयोटा फॉर्च्यूनर?

Viral Video: 'माझ्या बॉसला सांगा की मला कामावरून काढून टाकू नका', Indigo चं उड्डाणं रद्द झाल्यावर विमानतळावरील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT