restrictions are lifted grains oil will become expensive Pressure on the central government  Sakal
Personal Finance

निर्बंध हटताच धान्य, डाळींसह तेल महागणार; केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या दबावामुळे गेल्या दोन महिन्यापासून सर्वच धान्यासह डाळींचे भाव स्थिरावलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : देशात भाजप प्रणीत एनडीए सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली असली तरी हे कुबड्यावरील सरकार आहे. त्यामुळे सरकार चालविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तारेवरची कसर करावी लागणार आहे. तर जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या दबावामुळे गेल्या दोन महिन्यापासून सर्वच धान्यासह डाळींचे भाव स्थिरावलेले आहेत. पुढील काही दिवसात हे निर्बंध हटणार असल्याने सर्वच धान्यांसह डाळ आणि तेलाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळाले आहेत. परिणामी, सर्वसामान्यांचे जगणे कठीण होणार आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तुरीच्या डाळींची सरासरी किंमत १७० रुपये होती ती आता १९० रुपयांवर गेली आहे. पुढील महिन्याभरात तूर डाळ २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय गव्हाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. ३२ रुपये किलो असलेला गहू आता ३४ रुपयांवर गेला आहे. खाद्य तेलाच्या दरातही वाढ अपेक्षित आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.

याशिवाय तांदळाच्या दरातही वाढ झालेली आहे. प्रतिकिलो तांदूळ दोन रुपयांनी महागले आहे. एक किलो तांदळासाठी पूर्वी ६० रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी आता ६२ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ५० रुपये किलो असलेल्या तांदळासाठी ५२ रुपयावर गेले आहे. निवडणुकीच्या निकाल लागले असून आता सरकारही स्थापन झालेले आहे.

सध्या केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांना दर आठवड्याच्या साठ्याची माहिती देण्याची सक्ती केलेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून धान्यासह डाळी, तांदूळ आणि तेलाच्या खरेदीवर निर्बंध आले आहेत. हा दबाव दूर होताच. व्यापाऱ्यांकडून खरेदीचा सपाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वच जिन्नसांचे भाव आकाशाला भिडणार आहे.

बाजारात वाढली गर्दी

उन्हाळ्याच्या शाळेच्या सुट्या संपल्या असून पुढल्या आठवड्यात सीबीएससीच्या शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे शालेय साहित्यांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढलेली आहे. परिणामी, धान्य बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने धान्यांसह खाद्य तेलाचे भाव स्थिरावलेले आहेत. तसेच लग्नसराईचा मोसमही थंडावल्याने बाजारातील मंदीचा माहोल आहे, अशी माहिती नागपूर चिल्लर व्‍यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT