Rich Dad, Poor Dad author Robert Kiyosaki acknowledges he is 1.2 billion dollar in debt  Sakal
Personal Finance

Robert Kiyosaki: 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज; म्हणाले, मी दिवाळखोर झालो तर...

Robert Kiyosaki:'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कियोसाकी यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांच्यावर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले की, इतके कर्ज असूनही, ते चिंता करत नाहीत

राहुल शेळके

Robert Kiyosaki: 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कियोसाकी यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांच्यावर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले की, इतके कर्ज असूनही, ते चिंता करत नाहीत कारण ते मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात.

रोख बचत करण्याऐवजी, त्यांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले की, माझ्यावर एक अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे कारण कर्ज हा पैसा आहे. कियोसाकीने चांगले कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक देखील सांगितला आहे.

त्यांनी सांगितले की चांगल्या कर्जामुळे त्यांना संपत्ती वाढवण्यासाठी मदत झाली. गुंतवणुकीसाठी विशेषतः रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी लोकांनी कर्ज घ्यावे, असेही ते म्हणाले. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की त्यांच्या फेरारी आणि रोल्स रॉयस सारख्या आलिशान गाड्या पूर्णपणे कर्जावर विकत घेतल्या आहेत.

रॉबर्ट कियोसाकी, म्हणाले की त्यांच्यावर 1.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहेत, परंतु त्यांनी कबूल केले की जर ते दिवाळखोर झालो तर बँका देखील अडचणीत येतील.

रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सांगितले की, डॉलरपेक्षा चांदी सुरक्षित आहे. कियोसाकी यांनी चांदीच्या गुंतवणुकीला या काळातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे असे सांगितले. ते म्हणाले की, चांदी ही तेलानंतर सर्वात जास्त वापरली जाणारी दुसरी वस्तू आहे, ती पैशासारखी आहे.

या अगोदर लोकांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला सांगताना ते म्हणाले होते की, जर तुम्ही श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असाल तर आता संधी आली आहे. श्रीमंत होण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT