Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details
Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details Sakal
Personal Finance

Richest Saints of India : भारतातील 'या' 6 बाबांकडे आहे करोडोंची संपत्ती, जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

सकाळ डिजिटल टीम

Richest Saints of India : भारता हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. भारताला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. देशात असे अनेक संत आहेत, जे लोकांना साधे जीवन जगण्याचा उपदेश करतात, पण ते स्वतः करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही संतांची माहिती देत ​​आहोत ज्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. यातील एका संताने तर स्वतःचा देश स्थापन केला आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. (Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details)

वादग्रस्त धार्मिक नेते नित्यानंद हे देशातील सर्वात श्रीमंत बाबांपैकी एक आहेत. भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नित्यानंद बाबाने इक्वेडोरजवळ एक बेट विकत घेतले आहे. त्यांनी या बेटाचे नाव कैलास असे ठेवले.

2003 पासून नित्यानंद संत म्हणून त्याचा प्रचार सुरू झाला. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, नित्यानंद यांच्याकडे एकूण 10,000 कोटींची संपत्ती आहे. जगभर त्याच्या नावाने अनेक गुरुकुल, आश्रम, मंदिरे सुरू आहेत.

आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहेत. बलात्काराच्या आरोपाखाली आसाराम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते सध्या राजस्थानमधील जोधपूर कारागृहात बंद आहेत.

आकडेवारीनुसार, आसाराम यांचे देशभरात एकूण 350 हून अधिक आश्रम आहेत. आसाराम ट्रस्टनुसार एकूण उलाढाल 350 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर आसाराम यांच्याकडे एकूण 134 दशलक्ष डॉलर्स आहेत.

योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली आहे. यापूर्वी 1995 मध्ये त्यांनी दिव्य योग मंदिराची स्थापना केली होती.

ते देशातील प्रसिद्ध योगगुरू मानले जातात, ज्यांनी योगाला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांच्याकडे एकूण 1,600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

श्री-श्री रविशंकर हे देशातील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक आहेत. जगभरातील 150 देशांमध्ये त्यांचे 300 दशलक्षाहून अधिक अनुयायी आहेत. ते अनेक आयुर्वेदिक औषधांचा व्यवसायही करतात. ते 1,000 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृतानंदमयी यांचा समावेश होतो. त्या केरळ या राज्याच्या आहेत. त्यांच्याकडे एकूण 1,500 कोटी रुपयांची मालकी आहे.

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव हे देखील करोडोंचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे. इशा फाऊंडेशन योग शिबीर चालवते.

इशा फाऊंडेशन भारतासहित 'अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. मानसिक शांततेसाठी ईशा फाऊंडेशनचा (Esha Foundation) इनर इंजिनीअरिंग प्रोग्राम (inner Enginnering Programme) हा सध्या खूप प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT