Rozgar Mela Sakal
Personal Finance

Rozgar Mela: PM मोदींनी 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वाटप; म्हणाले तरुणांसाठी ही दिवाळी...

Rozgar Mela: तरुणांना कोणत्या विभागात मिळाल्या नोकऱ्या?

राहुल शेळके

Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 51,000 हून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. नोकरी मिळणाऱ्या तरुणांसाठी ही संधी दिवाळीपेक्षा कमी नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, 'रोजगार मेळावा' गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. केंद्रात एनडीए आणि भाजपशासित राज्यांमध्ये 'रोजगार मेळावा' आयोजित केला जात आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले – “विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केलेला ‘रोजगार मेळा’ हा आपल्या तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे. आमचे सरकार तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन मिशन मोडमध्ये काम करत आहे.

आम्ही केवळ रोजगारच देत नाही तर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करत आहोत. त्यामुळे लोकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढला आहे. आम्ही केवळ भरती प्रक्रिया केली नाही तर काही परीक्षांची पुनर्रचनाही केली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरतीसाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी झाला आहे. एसएससीच्या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातात. यामुळे भाषेच्या अडचणींचा सामना करणार्‍यांनाही संधी मिळाली आहे”

तरुणांना कोणत्या विभागात मिळाल्या नोकऱ्या?

शनिवारी देशातील 37 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र तसेच केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांच्या विभागांमध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना जॉईनिंग लेटर देण्यात आले.

या तरुणांना रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि मंत्रालयासह विविध मंत्रालयांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.

6 लाख लोकांना मिळाला रोजगार

28 ऑगस्टपर्यंत 8 रोजगार मेळ्यांतर्गत 5.5 लाखांहून अधिक लोकांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली होती. त्याचबरोबर 26 सप्टेंबरपर्यंत 6 लाखांहून अधिक तरुणांना जॉईनिंग लेटर देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 22 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळावा सुरू केला होता. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 लाख लोकांना रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT