Sahara Refund Investors in Sahara don't get Refund despite applying; What is the reason  sakal
Personal Finance

Sahara Refund: सहारामधील गुंतवणूकदारांना अर्ज करूनही पैसे मिळेना; काय आहे कारण?

Sahara Refund: सरकारने पैसे परत केले जातील असे आश्वासन दिले होते.

राहुल शेळके

Sahara Refund: सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे बुडतील अशी भीती होती. परंतु सरकारने पैसे परत केले जातील असे आश्वासन दिले होते. पोर्टलवरील अर्ज आणि त्याची छाननी झाल्यानंतर दीड महिन्यात परतावा मिळेल, असा दावा करण्यात आला होता. पण अद्याप गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत.

9.88 कोटी गुंतवणूकदारांचे 86,673 कोटी रुपये अडकले

सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लखनौ, सहारन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, भोपाळ, हमरा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, कोलकाता आणि स्टार्स मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हैदराबाद या चार सहकारी संस्थांमध्ये 9.88 कोटी गुंतवणूकदारांनी एकूण 86,673 कोटी रुपये जमा केले आहेत.

पैसे का मिळत नाहीत?

सहाराने सेबीच्या खात्यात सुमारे 25 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यापैकी 5000 कोटी रुपये सध्या प्राप्त झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांची मूळ रक्कम कमाल 10,000 रुपये आहे त्यांनाच परतावा मिळतो. ऑगस्ट 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुमारे तीन कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी https://mocrefund.crcs.gov.in/ हे स्वतंत्र पोर्टल तयार केले. यावर लाखो लोकांनी आपले पैसे काढून घेण्यासाठी अर्ज केले आहेत. माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुतांश गुंतवणूकदारांना सहाराचे पैसे मिळतील.

5000 पेक्षा कमी गुंतवणूकदार 1.13 कोटी

सहारा समूहाच्या या 4 सहकारी संस्थांमध्ये 1.13 कोटी छोटे गुंतवणूकदार आहेत ज्यांनी 5,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवली आहे. या गुंतवणूकदारांना एकूण 2793 कोटी रुपये द्यावे लागतील.

दुसरीकडे पाच ते 10 हजार रुपये (मुद्दल) जमा केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या 65.48 लाख आहे, ज्यांनी एकूण 1.07 कोटी खात्यांमध्ये एकूण 9112 कोटी रुपये जमा केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT