साई लाइफ सायन्सेस (Sai Life Sciences) लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स सादर केले आहेत. साई लाइफ सायन्सेस ही फुल सर्विस कॉन्ट्रॅक्ट रिसर्च, डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गेनायझेशन (CRDMO) आहे. यात खासगी इक्विटी फर्म टीपीजी कॅपिटलने यामध्ये गुंतवणूक केली आहे.
सेबीला सादर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (DRHP) मसुद्यानुसार, कंपनीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 800 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. 6.15 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेलही (OFS) असेल.
साई लाइफ सायन्सेसचे मुख्यालय हैदराबाद इथे आहे. कंपनी जागतिक फार्मास्युटिकल इनोव्हेटर कंपन्या आणि बायोटेक्नॉलॉजी फर्म्सना स्मॉल मॉलिक्युल न्यू केमिकल एंटिटीजसाठी (NCEs) औषधांचा शोध, विकास आणि मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेनमध्ये एंड-टू-एंड सेवा पुरवते. आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून मिळालेल्या पैशांपैकी 600 कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित पैशाचा एक भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च केला जाईल.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांची साई लाइफ सायन्सेस आयपीओसाठी मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
F&S अहवालानुसार, 2018-2023 दरम्यान भारताचा CRDMO बाजार आशिया पॅसिफिकमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक होता. ही वाढ कायम राहण्याची आशा आहे. 2023 ते 2028 दरम्यान भारतीय बाजारपेठेत 14 टक्के वाढ अपेक्षित आहे. भारताचे CRDMO मार्केट 2028 मध्ये 14.1 अरब अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.