Salaries of IIT Graduates: Sakal
Personal Finance

IIT Salary: आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा पगार झाला कमी; ऑफर्समध्येही झाली घट, काय आहे कारण?

Salaries of IIT Graduates: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मंदीचा फटका बसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना या वेळी कंपन्यांकडून कमी पगाराची ऑफर देण्यात आली आहे.

राहुल शेळके

Salaries of IIT Graduates: देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मंदीचा फटका बसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना या वेळी कंपन्यांकडून कमी पगाराची ऑफर देण्यात आली आहे.

अहवालानुसार यावेळी अनेक आयआयटी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना कमी पगाराची नोकरी मिळत असल्याची माहिती समोर आल्यावर आयआयटीच्या शिक्षणाची चमक कमी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

किती पगार देत आहेत कंपन्या?

डेलॉइट आणि टीमलीजच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या पगारात घट झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना सरासरी 15 ते 16 लाख रुपये वार्षिक वेतन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना सरासरी 18 ते 20 लाख रुपये वार्षिक वेतन देण्यात येत होते.

टीमलीज (डिग्री अप्रेंटिसशिप) चे सीईओ अल्लुरी रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या पगारात घट झाली आहे ते 7 जुन्या IIT संस्थांचे (बॉम्बे, दिल्ली, मद्रास, खरगपूर, कानपूर, रुरकी आणि गुवाहाटी) विद्यार्थी आहेत.

आयआयटीच्या नवीन कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पगारातही घट झाली आहे. IIT संस्था (रूपनगर, पंजाब) येथील प्लेसमेंट अधिकारी प्रीती गर्ग यांच्या मते, पगारातील घट किरकोळ आहे. गेल्या वर्षी सरासरी वेतन पॅकेज 18 लाख रुपये होते, यावेळी ते 17 लाख रुपये आहे.

टॉप ऑफर्सही झाल्या कमी

एक काळ असा होता की आयआयटीमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना करोडो रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळत होते. कंपन्या विद्यार्थ्यांना जास्त पगार देऊन त्यांची भरती करत असत. मात्र आता यातही घट झाल्याचे दिसून आले आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, यावेळी टॉप ऑफरमध्येही सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी टॉप ऑफर 4 कोटी रुपये होती.

या कारणांमुळे पगारात कपात

सध्या जगातील अर्थव्यवस्थेची स्थिती खूपच सुस्त आहे. अशा परिस्थितीत कंपन्या नवीन नोकर भरती करण्यास टाळाटाळ करत आहेत. रेड्डी यांच्या मते, सध्या अनेक उद्योग उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगाकडे वळत आहेत. यामध्ये स्पर्धाही वाढत आहे. अशा स्थितीत कंपन्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांऐवजी इंटर्नशिपला प्रोत्साहन देत आहेत.

टीमलीजच्या मते, कंपनी फ्रेशर्सपेक्षा अनुभवाला महत्त्व देत आहे. यामुळेच कंपन्या अनुभवी लोकांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेज देत असताना फ्रेशर्सना केवळ काही लाख रुपये देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत

अहवालानुसार, आयआयटी शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. 2022 मध्ये, केवळ 14,490 नोकऱ्या मिळवू शकल्या, तर IIT विद्यार्थ्यांची एकूण संख्या 17,900 होती. म्हणजे 3410 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही. हा आकडा 19 टक्के होता. त्याचप्रमाणे 2023 मध्ये 38 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT