same voice scam it company 80 thousand fraud cyber crime police finance Sakal
Personal Finance

Voice Scam Calls : हुबेहूब आवाजामुळे फसवणूक

एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्याचा व्‍हिडीओ कॉल आला. त्यात त्याने ताबडतोब ८० हजार रुपये सांगितलेल्या नंबरवर पाठवण्यास सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

- शिरीष देशपांडे

Voice Scam Calls : एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्याचा व्‍हिडीओ कॉल आला. त्यात त्याने ताबडतोब ८० हजार रुपये सांगितलेल्या नंबरवर पाठवण्यास सांगितले. या महिलेने त्या नंबरवर पैसे पाठवले; नंतर कळले तो कॉल खोटा होता. तोपर्यंत तिचे ८० हजार रुपये गेले होते.

हे कसे घडले...

हा फोन आला त्यावेळी ती महिला ऑफिसच्या कामात व्यस्त होती. तिला नवऱ्याचा हा व्हिडीओ कॉल खरा वाटला, कारण तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असे. त्यामुळे तिने नवऱ्याने सांगितलेल्या नंबरवर लगेच पैसे पाठवले.

तो व्हिडीओ कॉल ‘डीपफेक’ व ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ वापरून करण्यात आला होता. तिच्या नवऱ्याचा सोशल मीडियावरील फोटो आणि त्याचे संभाषण वापरून त्यात हवे तसे बदल करून हा कॉल करण्यात आला होता.

सायबर गुन्हेगार भामटे लोक आई-वडील, पती, पत्नी, भाऊ, बहिण, मुले जवळचे मित्र यांचे ‘डीपफेक’ आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्र वापरून व्हिडीओ कॉल बनवू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत तुमच्या मनात असलेल्या भावनांचा वापर करून हे भामटे बरोबर फास टाकतात.

बनावट कॉल कसा ओळखावा?

अशा बनावट व्हिडीओचा दर्जा अगदी खराब असतो. बॅकग्राउंड नीट दिसत नसते, आवाज व्यवस्थित नसतो. ज्या नंबरवर पैसे मागवले जातात, तो ‘जी-पे’ किंवा ‘पेटीएम’शी जोडलेला असतो. बँक खात्याचा तपशील असेलच असे नाही. आलेल्या कॉलमध्ये व्हिडीओ विचित्र दिसत असेल, तर काहीतरी गडबड आहे, याची खूणगाठ बांधावी. काय काळजी घ्यावी?

असा कॉल आला, तर कॉल चालू असताना उलटे-सुलटे प्रश्न विचारून खातरजमा करण्याचा प्रयत्न करा. घाबरून लगेच पैसे ट्रान्सफर अजिबात करू नका. फोन बंद झाल्यावर ज्याचा फोन होता, त्याला आपल्याकडे असलेल्या नंबरवर फोन करून खातरजमा करा.

फसवणूक झाल्यास...

असे काही झालेच, तर ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा आणि त्वरित १९३० या नंबरवर संपर्क साधा. या नंबरवरची यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.

(लेखक सीए असून, संगणक कंट्रोल व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT