SBI Brand Ambassador Mahendra Singh Dhoni Sakal
Personal Finance

MS Dhoni: एसबीआयने महेंद्रसिंग धोनीला केले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, कॅप्टन कूलवर मोठी जबाबदारी

SBI Brand Ambassador Mahendra Singh Dhoni: कॅप्टन कूलवर मोठी जबाबदारी

राहुल शेळके

SBI Brand Ambassador Mahendra Singh Dhoni: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. एसबीआयचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून धोनी विविध मार्केटिंग मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

धोनीसोबतच्या करारावर SBI चेअरमन काय म्हणाले?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे की, महेंद्रसिंग धोनीसोबतचा एसबीआयचा हा करार विश्वासार्हता आणि ग्राहकांशी सखोल संबंध निर्माण करेल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, परिस्थिती कितीही तणावपूर्ण असली तरी अशा काळातही संयम राखण्याची महेंद्रसिंग धोनीची उल्लेखनीय क्षमता आहे.

या सर्व क्षमतांचा विचार करून, SBI ने MS धोनीला देशभरातील ग्राहक आणि भागधारकांशी जोडण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे.

SBI चा होम लोन पोर्टफोलिओ

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही मालमत्ता, शाखा आणि ग्राहकांच्या आधारे भारतातील सर्वात मोठी बँक आहे. याशिवाय बँक सर्वात मोठी कर्जदार देखील आहे. गृहकर्जाबद्दल बोलायचे झाल्यास, बँकेने आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांना गृहकर्ज वितरित केले आहे आणि बँकेचा गृह कर्ज पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

गेल्या आठवड्यात बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले

शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असतानाही स्टेट बँकेच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी, शेवटच्या ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, SBI चे शेअर्स 2.69 टक्क्यांच्या वाढीसह 561.70 रुपयांवर बंद झाले.

मात्र, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे एसबीआयच्या बाजार भांडवलावर निश्चितच परिणाम झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 2,008.04 कोटी रुपयांनी घसरून 5,00,670.73 कोटी रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT