UBS Downgrades SBI Sakal
Personal Finance

UBS Report: SBI अन् Axis बँकेला दणका! UBS ब्रोकरेजने रेटिंग केले कमी, किरकोळ कर्जाबद्दल व्यक्त केली चिंता

UBS Downgrades SBI: गेल्या काही वर्षांत बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या संख्येत वाढ झाली आहे.

राहुल शेळके

UBS Downgrades SBI: विदेशी ब्रोकरेज हाऊस UBS ला असा विश्वास आहे की, वैयक्तिक कर्जासारख्या असुरक्षित कर्जात वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती ढासळू शकते कारण ज्या कर्जदारांकडे आधीच थकबाकी आहे अशा कर्जदारांनी गेल्या काही वर्षांत बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अॅक्सिस बँकेचे रेटिंगही कमी केले आहे. एसबीआयचे रेटिंग 'सेल' आणि अॅक्सिस बँकेचे रेटिंग 'न्यूट्रल' असे करण्यात आले आहे.

UBS ने सांगितले की जून 2023 पर्यंत, SBI च्या एकूण कर्जामध्ये असुरक्षित कर्जाचा वाटा 11.1 टक्के झाला आहे, तर Axis बँकेचे असुरक्षित कर्ज एकूण कर्जाच्या 10.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

या अहवालामुळे UBS ने SBI चे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे आणि लक्ष्य किंमत 740 वरून 530 रुपयांपर्यंत कमी केली आहे. अॅक्सिस बँकेच्या शेअर्सला तटस्थ ठरवताना, लक्ष्य किंमत 1,150 रुपयांवरून 1,100 रुपये करण्यात आली आहे.

यूबीएसच्या या अहवालामुळे एसबीआयचा शेअर 1.22 टक्क्यांच्या घसरणीसह 579 रुपयांवर व्यवहार करत होता, तर अॅक्सिस बँकेचा शेअर 1.45 टक्क्यांच्या घसरणीसह 1003.70 रुपयांवर व्यवहार करत होता.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 अखेर, क्रेडिट कार्ड कर्जावरील बँकांची थकबाकी 2.18 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी 1.68 लाख कोटी रुपये होती. वैयक्तिक कर्जाच्या थकबाकीत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बँकांना वैयक्तिक कर्जाबाबत सावध केले होते. ते म्हणाले होते की, अलीकडच्या काळात काही वैयक्तिक कर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर आरबीआय बारीक लक्ष ठेवून आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये डिफॉल्ट होण्याचा धोका

सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि NBFC खाजगी बँकांपेक्षा वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओवर डिफॉल्ट होण्याची शक्यता जास्त आहे कारण ते कमकुवत क्रेडिट प्रोफाइल असलेल्या अधिक कर्जदारांना कर्ज देतात.

10 लाखांपेक्षा जास्त वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा बाजारातील वाटा जूनपर्यंत 39% आहे. त्याच वेळी, 50,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या छोट्या वैयक्तिक कर्जांमध्ये NBFC चा बाजारातील वाटा सुमारे 74% आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT