SBI is offering up to 65 bps discount on home loans to certain borrowers  Sakal
Personal Finance

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! गृहकर्जावर मिळणार सूट, ऑफर फक्त 'या' तारखेपर्यंत

SBI Home Loans offers: गृहकर्जावरील ही ऑफर CIBIL स्कोअरच्या आधारे मिळणार आहे.

राहुल शेळके

SBI Home Loans offers: तुम्ही गृहकर्ज घेऊन घर बांधण्याचा किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी ऑफर दिली आहे. SBI ग्राहकांना गृहकर्जावर 65 बेस पॉइंट्स (0.65 टक्के) पर्यंत सूट देत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्ज घेणाऱ्यांना 0.65 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंतच घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे गृहकर्जावरील ही सवलत CIBIL स्कोअरच्या आधारे मिळणार आहे.

CIBIL स्कोर काय आहे?

 CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोरची नोंद ठेवली जाते. याद्वारे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे आर्थिक उत्पन्न कसे वापरले आहे, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट स्कोर यांची माहिती मिळते.

CIBIL स्कोअरवर आधारित गृहकर्ज ऑफर काय आहे?

  • CIBIL स्कोअर 750-800 आणि त्याहून अधिक असेल तर गृह कर्जाचा व्याजदर 8.60 टक्के आहे. यामध्ये 0.55 टक्के सूट देण्यात येत आहे.

  • CIBIL स्कोअर 700 ते 749 असेल तर यावर 0.65 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑफर व्याज दर 8.7 टक्के आहे.

  • CIBIL स्कोअर 151-200 दरम्यान असेल तर SBI गृहकर्जावर 0.65 टक्के सूट देत आहे. याचा व्याजदर 8.7 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT