SBI  esakal
Personal Finance

SBI : स्टेट बँकेला तिमाहीत विक्रमी निव्वळ नफा

देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा नोंदवला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा नोंदवला आहे. बँकेने गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात १७८.२५ टक्के वाढ नोंदवत, १६,८८४ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

बँकेने आज तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही २४.०५ टक्के वाढ झाली असून, ते ३८,९०४ कोटी रुपयांवर गेले आहे. ऑपरेटिंग नफाही ९८.३७ टक्के वाढून २५,२९७ कोटी रुपये झाला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो १२,७५३ कोटी होता. बँकेने कर्ज व्यवसायातही वार्षिक १३.९० टक्के वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत एसएमई क्षेत्रांना कर्जपुरवठा वार्षिक १८.२७ टक्के वाढला असून, वैयक्तिक कर्ज वितरण १६.४६ टक्क्यांनी वाढल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेच्या ठेवी १२ टक्के वार्षिक दराने वाढल्या असून,कासा ठेवी ५.५७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कासा ठेवींचे प्रमाण ३० जून २०२३ अखेर ४२.८८ टक्के आहे. तरतुदींचे प्रमाण वार्षिक ४३ टक्क्यांनी कमी झाल्या असून, या तिमाहीत २५०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तिमाहीत बँकेने अनार्जित कर्जांचे प्रमाण अर्थात एनपीएदेखील नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले आहे. जून तिमाहीत, एकूण एनपीए २.७६ टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर निव्वळ एनपीए ही ०.७१ टक्क्यांवर आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT