SBI MCLR Rate Hike 
Personal Finance

SBI Hikes Interest Rates : SBIचा ग्राहकांना मोठा झटका! आजपासून वाढणार कर्जांचा EMI, नवे दर काय समजून घ्या

MCLR Rate Hike SBI Loan EMI Impact August 2024 : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

रोहित कणसे

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या वेगवेगळ्या कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये 10 बेसिक पॉइंट्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर आज म्हणजेच 15 ऑगस्ट पासून लागू होतील. एसबीआयकडून एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.

नवे दर काय?

तीन वर्षांच्या काळावधीसाठी एसबीआयने नवीन एमसीएलआर आथा 9 टक्क्यांहून वाढून 9.10 टक्के करण्यात आली आहे. तर ओव्हरनाइट एमसीएलआर 8.10 टक्क्यांहून वाढून 8.20 टक्के झाला आहे.

  • ओव्हरनाइट: 8.10% वरून 8.20% पर्यंत वाढ

  • एक महिना: 8.35% वरून 8.45% पर्यंत वाढले

  • तीन महिने: 8.40% वरून 8.50% पर्यंत वाढले

  • सहा महिने: 8.75% वरून 8.85% पर्यंत वाढले

  • एक वर्ष: 8.85% वरून 8.95% पर्यंत वाढले

  • दोन वर्षे: 8.95% वरून 9.05% पर्यंत वाढले

  • तीन वर्षे: 9.00% वरून 9.10% पर्यंत वाढले

सलग तिसऱ्या महिन्यात झाली वाढ

पीएसयू बँकेने जून २०२४ पासून थोड्यात काळात एमसीएलआर हा 30 बेसिस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढवले आहेतत. MCLR हा किमान व्याजदर असतो ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. यासाठी काही अपवाद असतात ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) परवानगी दिलेली अशते. MCLR दर वाढल्याने गृहकर्ज, कार लोन, शैक्षणिक कर्ज यांसारखी कर्जे ग्राहकांसाठी महाग होतील. मागील बेस रेट सिस्टमच्या जागी कर्ज देण्याच्या दरांसाठी बेंचमार्क म्हणून एप्रिल 2016 मध्ये एमलीएवआरची आरबीआयने सुरूवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT