SBI refuses to disclose details of electoral bonds under RTI Act  Sakal
Personal Finance

Electoral Bonds: SBIने आरटीआय कायद्यांतर्गत निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास दिला नकार; काय आहे कारण?

Electoral Bonds: स्टेट बँक ऑफ इंडियाने माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत निवडणूक आयोगाला दिलेल्या इलेक्टोरल बाँडचे तपशील देण्यास नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी 13 मार्च रोजी एसबीआयशी संपर्क साधला आणि त्यांनी RTI अंतर्गत निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती मागितली.

राहुल शेळके

Electoral Bond SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाने माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत निवडणूक आयोगाला दिलेल्या इलेक्टोरल बाँडचे तपशील देण्यास नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी 13 मार्च रोजी एसबीआयशी संपर्क साधला आणि त्यांनी RTI अंतर्गत निवडणूक रोख्यांची माहिती मागितली.

बँकेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दोन कलमांचा हवाला देत माहिती देण्यास नकार दिला. हे कलम 8(1)(e) आणि 8(1)(j) आहेत. पहिले कलम रेकॉर्डशी संबंधित आहे तर दुसरे कलम वैयक्तिक माहिती न देण्याशी संबंधित आहे.

केंद्रीय जन माहिती अधिकारी आणि एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक यांच्याकडून बुधवारी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, “तुम्ही मागितलेल्या माहितीमध्ये खरेदीदार आणि राजकीय पक्षांचे तपशील आहेत आणि म्हणून ते उघड केले जाऊ शकत नाही.''

बत्रा यांनी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना बँकेने भरलेल्या शुल्काच्या रकमेचा तपशीलही मागितला होता, ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगून संबंधित माहिती देण्यास नकार दिला. एसबीआयने निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर आधीच असलेली माहिती देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत असल्याचे बत्रा म्हणाले.

निवडणूक आयोगाने 14 मार्च रोजी एसबीआयने जारी केलेला डेटा आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे, ज्यात राजकीय पक्ष आणि देणगीदारांचे तपशील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी एसबीआयला प्रत्येक इलेक्टोरल बाँडसाठी युनिक नंबरसह संपूर्ण माहिती न दिल्याबद्दल फटकारले होते.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, खरेदीदारांची नावे, रक्कम आणि खरेदीची तारीख यासह बाँडचे सर्व तपशील उघड करावेत.

आयोगाने 14 मार्च रोजी एसबीआयने सादर केलेला डेटा आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केला होता, ज्यात बाँड खरेदी करणाऱ्या देणगीदारांचे तपशील आणि त्यांची पूर्तता करणाऱ्या राजकीय पक्षांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT