SEBI Action Sakal
Personal Finance

SEBI Action: सेबीने 'बाप ऑफ चार्टवर' घातली बंदी, 17 कोटी रुपये परत करण्याचे दिले आदेश

SEBI Action: सोशल मीडियावर शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचा दावा केला होता

राहुल शेळके

SEBI Action: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अलीकडेच मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारीवर कारवाई केली आहे. गुंतवणुकीचा सल्ला दिल्याबद्दल 17.2 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश त्याला दिले आहेत.

सोशल मीडियावर शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या इन्फ्लुएंसरवर सेबी बारकाईने लक्ष ठेवून आहे.

'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि 'टेलीग्राम' वर लोकांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणारे 'बाप ऑफ चार्ट' म्हणून ओळखला जाणारा फायनान्सर मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी याच्यावर सेबीने कारवाई केली आहे. याशिवाय, गुंतवणूक सल्लागारांना अनधिकृत सल्ला देणाऱ्या आणखी दोन संस्थांना शेअर बाजारात व्यवसाय करण्यापासून सेबीने थांबवले आहे.

'बाप ऑफ चार्ट्स' चे YouTube वर 443,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि X (पूर्वीचे Twitter) वर 83,000 फॉलोअर्स आहेत. सेबीने दावा केला आहे की मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी हे शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली व्यावसायिक सल्ला देत होते आणि त्यांच्याकडून शुल्क आकारत होते.

SEBI च्या तपासात असे समोर आले आहे की मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी याला जानेवारी 2021 ते जुलै 2023 या कालावधीत 2.89 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

सेबीच्या म्हणण्यानुसार, नसीरुद्दीन अन्सारी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:ला स्टॉक मार्केट एक्सपर्ट म्हणून सांगायचा.

तो गुंतवणूकदारांना शेअर बाजाराशी संबंधित त्याच्या स्वत:च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास सांगत असे. तसेच गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळेल या विश्वासाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले.

सोशल मीडिया फायनान्स इन्फ्लुएंसरच्या सल्ल्याने सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये याची खात्री करण्यासाठी, सेबी त्यांच्या विरोधात कारवाई करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT