SEBI bans Varanium Cloud SME firm from capital market for misusing IPO proceeds  Sakal
Personal Finance

SEBI Bans: सेबीची मोठी कारवाई! कंपनीवर घातली बंदी; गुंतवणूकदारांनाही दिला सल्ला, काय आहे प्रकरण?

Sebi Bans: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एसएमई कंपनी व्हॅरेनियम क्लाउडवर मोठी कारवाई केली आहे. व्हॅरेनियम क्लाउडचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे यांच्यावर सेबीने बंदी घातली आहे.

राहुल शेळके

Sebi Bans: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एसएमई कंपनी व्हॅरेनियम क्लाउडवर मोठी कारवाई केली आहे. व्हॅरेनियम क्लाउडचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे यांच्यावर सेबीने बंदी घातली आहे. कंपनीवर चुकीची आर्थिक माहिती सांगितल्याचा आरोप आहे. सेबीने एका आठवड्यात SME कंपनीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. यासोबतच सेबीने गुंतवणूकदारांना मोठा सल्लाही दिला आहे.

कंपनीवर काय आरोप आहे?

कंपनीवर चुकीची आर्थिक माहिती सांगितल्याचा आरोप सेबीने केला आहे. आयपीओच्या पैशांचा गैरवापर करून दुसऱ्या कंपनीकडे पैसे वळवण्यात आले आहेत. IPO मधून 40.63 कोटी रुपये उभारण्यात आले आणि मोठी रक्कम दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. 60% निधी अशा कंपनीला पाठवण्यात आला होता ती कंपनी पूर्णपणे वेगळी आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात बोनस आणि स्टॉक स्प्लिटसह गुंतवणूकदारांना आकर्षित केले. मोठ्या घोषणेनंतर शेअर्स वाढले तेव्हा प्रवर्तक त्यांचे शेअर्स विकून निघून गेले.

सेबीचा आरोप आहे की बहुतेक विक्री-खरेदीचे आकडे फक्त खातेवहीच्या नोंदी आहेत. आयटी कंपनी केवळ कागदावरच चालवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या कंपनीवर कारवाई करत सेबीने व्हॅरेनियम क्लाउडचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे यांच्यावर बंदी घातली आहे. लेखापरीक्षकाची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण NFRA (नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी) कडे पाठवण्यात आले आहे.

सेबीचा गुंतवणूकदारांना सल्ला

व्हॅरेनियम क्लाउडवर कारवाई केल्यानंतर सेबीने गुंतवणूकदारांना एसएमई कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करण्याचा सल्लाही दिला आहे. SEBI ने गुंतवणूकदारांना त्वरीत मोठा परतावा मिळवण्याच्या फंदात पडू नये, तसेच SME गुंतवणूकदारांनी परताव्याच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत असे सांगितले आहे. परताव्याच्या अपेक्षेबाबत गुंतवणूकदारांनी जबाबदार दृष्टिकोन बाळगावा.

व्हॅरेनियम क्लाउडपूर्वी, सेबीने अलीकडेच इतर दोन एसएमई कंपन्या ॲड शॉप ई-रिटेल आणि व्हाइट ऑरगॅनिक्स ॲग्रोवर बंदी घातली होती. यामध्ये प्रवर्तकांनीच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घोळ घातल्याचा आरोप करण्यात आला होता. अनियमितता आढळल्यानंतर सेबीने प्रवर्तक दिनेशभाई पंड्या आणि इतरांवर बंदी घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT