Ratan Tata Sakal
Personal Finance

Ratan Tata Birthday : काय आहे टाटा-अंबानींच्या यशामागचं सत्य ? कसा कमवला पैसा ?

गरीब म्हणून जन्माला येणे हे तुमची चूक नसेल; पण गरीब म्हणूनच मरणे ही तुमची चूक असेल, असे त्यांचे म्हणणे होते.

नमिता धुरी

मुंबई : आज रतन टाटा आणि धीरुभाई अंबानी या दोन मोठ्या उद्योगपतींचा वाढदिवस आहे. या उद्योगपतींनी आजवर बरीच प्रतिष्ठा आणि पैसा कमवला. त्यांचं ऐषारामी आयुष्य सामान्यांना भुरळ घालतं.

या दोघांनीही आजवर जे काही यश कमवलं त्यामागे त्यांची विचारसरणी, कामावरची निष्ठा या गोष्टी कारणीभूत होत्या हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण त्यांच्या यशामागची आणखी काही गुपितं जाणून घेऊ या. हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

धीरुभाई अंबानी असे मानत की, ज्याच्यात स्वप्नं बघण्याची हिंमत आहे तो जग जिंकू शकतो. तुम्ही तुमचं स्वप्नं पूर्ण केलं नाही तर दुसरं कोणीतरी तुम्हाला कामावर ठेवून त्याचं स्वप्नं पूर्ण करेल.

गरीब म्हणून जन्माला येणे हे तुमची चूक नसेल; पण गरीब म्हणूनच मरणे ही तुमची चूक असेल, असे त्यांचे म्हणणे होते. जोखीम उचलल्याशिवाय यश मिळत नाही. मोठा विचार करा, लवकर विचार करा आणि भविष्याचा विचार करा; कारण विचारावर कोणाची मक्तेदारी नाही, असे अंबानी म्हणत.

कंपनीची ध्येयधोरणं आणि इतर महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यासाठी कारखान्यातील मजुराप्रमाणे काम करा असे रतन टाटा सांगतात. लोकांनी तुमच्यावर मारलेल्या दगडांनी स्मारक बांधा. तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकट्यानेच चाला; पण तुम्हाला दूरपर्यंत चालायचे असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चाला, असे ते म्हणतात.

योग्य निर्णय घेण्यापेक्षा घेतलेले निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यावर टाटा यांचा विश्वास आहे. रतन टाटा म्हणतात, एखाद्या व्यक्तीच्या विचारांपेक्षा तिचा दुसरा कोणताही शत्रू असू शकत नाही.

टाटा आणि अंबानींच्या याच विचारसरणीमुळे त्यांनी धाडसी निर्णय घेतले, नवकल्पना राबवल्या आणि त्याच्याच बळावर पैसा, प्रतिष्ठा कमवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"करिअरमधील अस्थिरतेमुळे मी डिप्रेशनमध्ये.."करण सिंग ग्रोव्हरचा नैराश्याबद्दल खुलासा

Latest Marathi Breaking News Live : मनमाडमध्ये नगरसेवक पदासाठी ४२ अर्ज दाखल, तर अद्याप नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही

Solapur News:'कर्करोग केंद्र योजनेतून सोलापूरला वगळले'; शहरावर तीन राज्यांच्या रुग्णांचा भार; तरीही शासनाकडून दुर्लक्ष

Mumbai News: एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! बीएमसी साडेचार किमीचा नवा उड्डाणपूल बांधणार, वाचा संपूर्ण मेगाप्लॅन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव? उपकर्णधार रिषभ पंतने सांगितली टीम इंडियाची चूक

SCROLL FOR NEXT