Vodafone Idea sakal
Personal Finance

Vodafone Idea : ‘व्होडाफोन-आयडिया’च्या ‘एफपीओ’ला सातपट मागणी

व्होडाफोन आयडियाच्या ‘एफपीओ’मध्ये आज शेवटच्या दिवसाअखेर जवळपास सात पटीने अधिक मागणी झाली आहे. आज शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी आठ हजार कोटी रुपयांच्या शेअरसाठी अर्ज केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : व्होडाफोन आयडियाच्या ‘एफपीओ’मध्ये आज शेवटच्या दिवसाअखेर जवळपास सात पटीने अधिक मागणी झाली आहे. आज शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी आठ हजार कोटी रुपयांच्या शेअरसाठी अर्ज केले. हा ‘एफपीओ’ अठरा हजार कोटी रुपयांचा असून, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या राखीव कोट्याच्या साडेसतरा पट शेअरसाठी अर्ज केले आहेत, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चार पट जास्त अर्ज केले आहेत.

छोट्या गुंतवणूकदारांनी जेमतेम ९१ टक्के शेअरसाठी अर्ज केले. यापूर्वीच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अकरा रुपयांच्या किमतीला पाच हजार चारशे कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत. या रकमेपैकी १२ हजार ७०० कोटी रुपये खर्चूनकंपनी फोर-जी व फाइव्ह-जी नेटवर्कचे सक्षमीकरण करणार आहे. व्होडाफोन-आयडियाचा शेअर आज १२.९० रुपयांवर बंद झाला.

भागधारकांची संख्या ४० लाखांवर

व्होडाफोन-आयडिया या देशातील मोठ्या दूरसंचार कंपनीच्या भागधारकांची संख्या आता ४० लाखांचा टप्पा ओलांडणार आहे. सध्या कंपनीच्या ‘एफपीओ’मध्ये गुंतवणूक सुरू आहे. त्यापूर्वी त्यांचे देशातील एक हजार लहान-मोठ्या शहरांमध्ये ३८ लाख १८ हजार भागधारक होते. आता आणकी ३.५ लाख अर्ज आले आहेत. व्होडाफोनच्या एकूण भागधारकांमध्ये साडेसहा टक्के बडे वैयक्तिक गुंतवणूकदार असून, या तीस हजार गुंतवणूकदारांकडे प्रत्येकी सरासरी सुमारे एक लाखाहूनही जास्त शेअर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT