Sakal Money event sakal
Personal Finance

Sakal Money : शेअर बाजार व सोन्यातील तेजीची झेप कुठवर असेल? ‘सकाळ मनी’ द्विवर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रम

पर्सनल फायनान्स क्षेत्रातील एकमेव विश्वासार्ह मराठी मासिक असलेल्या ‘सकाळ मनी’ला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पर्सनल फायनान्स क्षेत्रातील एकमेव विश्वासार्ह मराठी मासिक असलेल्या ‘सकाळ मनी’ला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत वाचक-गुंतवणूकदारवर्गाकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. या द्विवर्षपूर्तीनिमित्ताने वाचक-गुंतवणूकदारांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सध्या शेअर बाजार आणि सोने-चांदी या गोष्टी योगायोगाने तेजीत असून, त्यांनी उच्चांकी शिखर गाठले आहे. अशावेळी या तेजीमागची कारणे काय आहेत, तसेच या तेजीची झेप कुठवर असेल, असे प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात येत आहेत. नेमक्या याच प्रश्नांचा तज्ज्ञांकडून वेध घेतला जाणार आहे. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरेही दिली जातील.

आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) महेश पाटील (मुंबई) आणि पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमित मोडक (पुणे) या तज्ज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन मिळणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल. मात्र, सभागृहाची आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा राखीव असतील.

कार्यक्रम कधी व कोठे?

वार व तारीख : शनिवार, ता. १३ एप्रिल २०२४

वेळ : सकाळी १० ते दुपारी १

स्थळ : बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे-३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT