share market capitalisation indicates the size and performance of stock  sakal
Personal Finance

चाल हत्ती आणि हरणाची!

शेअर बाजारात काही कंपन्यांच्या शेअरचेदेखील तसेच असते. शेअरचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ हे त्याची ‘स्थूलता’ दर्शविते.

गोपाळ गलगली

स्थूलता आणि हालचाल या परस्परविरोधी गोष्टी आहेत. हत्ती क्वचितच बसतो. बसला तर उठणे त्याला कठीण जाते. त्याची चाल संथ-गंभीर असते. परंतु एखादी माशी मात्र आकाशात झटकन भरारी मारू शकते. शेअर बाजारात काही कंपन्यांच्या शेअरचेदेखील तसेच असते. शेअरचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ हे त्याची ‘स्थूलता’ दर्शविते.

अशा कंपनीच्या शेअरभावात फारशी वाढ होत नसते. हा शेअर चढत-चढत वर येऊन पोहचलेला असतो. अशा कंपन्यांना आपण जेथे पोहचलो आहोत, तेथे राहण्यासाठी खटपट करावी लागते. त्यांचा वेग मंदावतो. उलट छोट्या कंपन्यांचे शेअर हरणासारखे चपळ असतात. त्यांच्यातील वाढ वेगवान असते. असे शेअर प्रसंगी जास्त फायदा देऊन जातात.

हरणासारखे चपळ शेअर

कमी बाजारभाव, कमी मार्केट कॅपिटलायझेशन; परंतु जास्त परतावा देणारे शेअर : आयआरसीटीसी, आयआरएफसी, रेलटेल, रेल विकास निगम, पॉवरग्रीड, ऑईल इंडिया, टाटा कन्झुमर प्रॉडक्टस, झोमॅटो, एनएचपीसी, कॅनरा बँक, टोरेंट फार्मा आदी अनेक.

सारांश

अलीकडे घसरलेला शेअर बाजार गुंतवणूकसंधी देत आहे. अशावेळी अभ्यासपूर्ण जोखीम घेण्यास हरकत नसावी.

शेअरचे नाव- मार्केट कॅप. (रु. कोटी) -२५ जाने.चा भाव (रु.) -परतावा (टक्के)
३ महिने- ६ महिने -१ वर्ष- ३ वर्षे
  • हिंदुस्थान युनिलिव्हर-५७३६८७- २४४०- (२)- (५)- (६)- १

  • एचडीएफसी बँक -१०८३२८०- १४४०- (३)- (१३)- (१४)- (१)

  • एशियन पेंट्‌स -२८७७०६- २९४९ -(२)- (१५)- ७ -(५)

  • कोटक महिंद्र बँक -३५५५११ -१७७५ -३- (६)- २ -(२)

  • डी-मार्ट -२४२५७७ -३७४५ -२ -२- ६- ३०-

  • मारूती सुझुकी -३१४०३१- ९८८०- (५)- ३ -१५ -२४

  • डाबर इंडिया- ९५०८७ -५३३ -३ -(५) -(५)- (१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT