share market finance bse celebrates 149th foundation day unveils new logo sakal
Personal Finance

BSE : बीएसई ने साजरा केला १४९ वा स्थापना दिन; नवीन लोगोचे अनावरण

नवीन लोगो विश्वास आणि जबाबदारीवर भर देण्याबरोबरच समृद्धी, चैतन्य, प्रगती आणि नवीन सुरुवात दर्शवते, असेही सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आशियातील सर्वात जुने शेअर बाजार असलेले बाँबे स्टॉक एक्सचेंज पुढील वर्षी १५० वे वर्ष पूर्ण करीत असून आज बीएसई चा १४९ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी बीएसई ने आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले.

नवीन लोगो विश्वास आणि जबाबदारीवर भर देण्याबरोबरच समृद्धी, चैतन्य, प्रगती आणि नवीन सुरुवात दर्शवते, असेही सांगण्यात आले. बीएसई चे अध्यक्ष एस. एस. मुंद्रा यांच्या हस्ते हे अनावरण झाले. हा टप्पा गाठण्यात मोलाची भूमिका बजावणारे संस्थापक तसेच आजी-माजी अधिकारी आदींचा मुंद्रा यांनी गौरव केला.

यावेळी बीएसईचे एमडी आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यांनी भारतीय भांडवली बाजार सक्षम करण्यात बीएसई ने बजावलेल्या भूमिकेची माहिती दिली. राममूर्ती यांनी नवीन लोगोचा अर्थही उलगडून सांगितला. गुंतवणुकदारांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी बीएसई ने काढलेल्या चार लघुपटांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT