Share Market Opening Bell eSakal
Personal Finance

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची धमाकेदार सुरूवात, सेन्सेक्स 70 हजारांवर उघडला; निफ्टीनेही केला रेकॉर्ड

Sensex Today : सेन्सेक्स आणि निफ्टी आज ऑल-टाईम-हाय उघडले आहेत.

Sudesh

Share Market All time High : भारतीय शेअर मार्केटची आज (14 डिसेंबर) धमाकेदार सुरूवात झाली आहे. मार्केट सुरू होताना BSE सेन्सेक्स 561.49 अंकांनी वर जाऊन 70,146 अंकावर उघडला. हा आतापर्यंतचा सर्वात उच्च रेकॉर्ड आहे. दुसरीकडे निफ्टीदेखील 184.05 अंकांनी वर जाऊन 21,110.40 अंकांवर उघडला.

आज बाजारात सगळीकडे ग्रीन मार्क दिसत आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँकनिफ्टी आणि मिडकॅप इंडेक्स देखील तेजीत व्यवहार करत आहेत.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. यानंतर अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये तेजी दिसली. याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही दिसून आला. यामुळेच आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी आकड्यांवर उघडले.

बँकनिफ्टी

शेअर मार्केट उघडल्यानंतर Bank Nifty 626.30 अंकांच्या तेजीसह 47,718 अंकांवर पोहोचली होती. बँकनिफ्टीमधील सर्व 12 शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत होते. यात बंधन बँक टॉप गेनर्स यादीमध्ये सर्वात वर आहे.

निफ्टी

मार्केट उघडताना निफ्टीमधील 50 पैकी 50 शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत होते. यातील टॉप गेनर्समध्ये एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे होते. इन्फोसिस आणि विप्रोमध्येही भरपूर वाढ दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली? सोशल मीडियावरील मेसेजबाबत स्वत: मुंढे यांनी दिलं स्पष्टीकरण

'मी ज्या मैदानावर खेळले तिथेच माझं मुलही...' जेनिलिया देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली...

Meta AI on WhatsApp: इमेज जनरेशन ते ट्रॅव्हल प्लॅनिंग! 'मेटा AI' ची ५ भन्नाट फीचर्स जी तुम्ही व्हॉट्सॲपवर वापरू शकता!

Rickshaw-Taxi Fare Hike: रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार; किती भाडे वाढणार?

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये CJP पथकावर हल्ल्यानंतर भाजप आमदाराची खोचक टीका; म्हणाले, ‘घरात झुरळाचा काही उपयोग नसतो’

SCROLL FOR NEXT