Share Market Top Shares Esakal
Personal Finance

Share Market Top Shares: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

Share Market Top Shares : बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले आहेत. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Share Market Top Shares : बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले आहेत. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 408.86 अंकांनी अर्थात 0.55 टक्क्यांनी वाढून 74,085.99 वर बंद झाला आणि निफ्टी 117.70 अंकांनी म्हणजेच 0.53 टक्क्यांनी वाढून 22,474.00 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बुधवारच्या व्यवसायात प्रचंड चढ-उतार दिसून आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगिताले. सकाळच्या सत्रात बेअर्सचे वर्चस्व होते आणि मिड आणि स्मॉलकॅप विभागातील मोठ्या नुकसानामुळे बाजारातील सेंटीमेंट्स दुखावल्या. व्यापार सत्राच्या उत्तरार्धात बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ दिसली, ज्यामुळे इंडेक्सला दबावावर मात करण्यास मदत झाली. याशिवाय, दिग्गज शेअर्समधील रिकव्हरीमुळेही वाढीला चालना मिळाली, ज्यामुळे बाजाराने नवीन उच्चांक गाठला. डेली चार्टवर, निफ्टीने 22,300 च्या सपोर्टचे रक्षण केले आणि तेजीचा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार केला. आता निफ्टीमध्ये 22,600-22,650 चे टारगेट शक्य आहे. तर निफ्टीला 22,300 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट दिसत आहे.

सर्व क्षेत्रांतील फिरत्या खरेदीमुळे निर्देशांकाला सकारात्मक कल राखण्यास मदत होत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. निफ्टीमध्ये आता लवकरच 22,800 ची पातळी शक्य आहे. तथापि, ब्रॉडर मार्केटच्या चिंतेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या इंडेक्सना आणि मोठ्या मिडकॅप्सना दीर्घ व्यवहारासाठी प्राधान्य दिले पाहिजे.स्मॉलकॅप काउंटरमध्ये जोखीम कमी केली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • पीएफसी (PFC)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • कमिन्स इंडिया(CUMMINSIND)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे - ऋतुराज गायकवाडचा शतकी धमाका; मुंबई - महाराष्ट्र संघांना सावरलं

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

Crime News : मानवतेला काळिमा फासणारी घटना! बापाने स्वत:च्याच दोन मुलींना संपवलं, धक्कादायक कारण समोर...

SCROLL FOR NEXT