stock sakal
Personal Finance

Stock Market : 'हा' पीएसयू स्टॉक येत्या काळात देईल दमदार परतावा, आताच खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला...

पॉवर फायनान्स सेक्टरमधील सरकारी कंपनी आरईसी लिमिटेडच्या (REC Limited) शेअर्समध्ये बुधवारी जोरदार वाढ झाली. हा शेअर तब्बल 8 टक्क्यांनी वाढला. गेल्या एका वर्षात 250 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा हा शेअर तिसऱ्या तिमाहीच्या (Q3FY24) निकालानंतर पुन्हा एकदा मोठी झेप घेण्यास तयार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॉवर फायनान्स सेक्टरमधील सरकारी कंपनी आरईसी लिमिटेडच्या (REC Limited) शेअर्समध्ये बुधवारी जोरदार वाढ झाली. हा शेअर तब्बल 8 टक्क्यांनी वाढला. गेल्या एका वर्षात 250 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा हा शेअर तिसऱ्या तिमाहीच्या (Q3FY24) निकालानंतर पुन्हा एकदा मोठी झेप घेण्यास तयार आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आरईसी लिमिटेडच्या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आहे.

सीएलएसएने आरईसी लिमिटेडच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 510 रुपये ठेवण्यात आली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 280 टक्क्यांहून अधिक तेजी घेतली आहे. तर 6 महिन्यांत या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 170 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. बुधवारी हा शेअर 7.65 टक्क्यांनी वाढून 468 रुपयांवर स्थिरावला.

आरईसीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. वार्षिक आधारावर नफा 14 टक्क्यांनी वाढून 3300 कोटीवर पोहोचला आहे. कंपनीने व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ नोंदवली आहे. लोन ग्रोथमध्ये 21% (YoY) ची मजबूत वाढ दिसून आली आहे. अपेक्षेप्रमाणे, तिसर्‍या तिमाहीत निगेटिव्ह क्रेडिट कॉस्‍ट राहिली. कंपनीच्या एसेट क्‍वॉलिटी सुधारली आहे. तिमाही आधारावर जीएनपीए 36 बीपीने कमी झाला आहे.

पीएसयू कंपनी आरईसी लिमिटेडचा तिसऱ्या तिमाहीत (Q3FY24) निव्वळ नफा 13.5 टक्क्यांनी वाढून 3,308.42 कोटीवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट 2,915.33 कोटी नोंदवला गेला. कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 12,071.54 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 9,795.47 कोटी होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT