Should you exit mutual funds now? Sakal
Personal Finance

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातून आता बाहेर पडावे काय? आधी पुढील मुद्द्यांचा विचार करा

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरु करताना आपण ठरवलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे का हे प्रथम तपासून पाहावे.

-डॉ. वीरेंद्र ताटके

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने केलेल्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरीचे प्रतिबिंब इक्विटी म्युच्युअल फंडात देखील पडले. बहुसंख्य इक्विटी म्युच्युअल फंडांच्या ‘एनएव्ही’देखील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श करून आल्याचे चित्र दिसत आहे. या तेजीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून कमावलेला नफा पदरात पाडून घेण्याचा विचार करत असाल, तर पुढील मुद्द्यांचा विचार करावा.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरु करताना आपण ठरवलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे का हे प्रथम तपासून पाहावे. उदाहरणार्थ, गुंतवणूक सुरू करताना आपण त्यातून मुद्दल आणि नफा असे मिळून २५ लाख रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले असेल, तर ते उद्दिष्ट साध्य झाले की नाही हे तपासून पाहावे. केवळ बाजार सर्वोच्च पातळीवर आहे म्हणून घाईघाईने आपली गुंतवणूक विकून टाकू नये.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री करून मिळणाऱ्या रकमेचे काय करणार, याचा आधी निश्चित विचार करून ठेवा; अन्यथा असे पैसे आपल्या बँक खात्यावर पडून राहू शकतात किंवा खर्च होऊ शकतात. गृहकर्ज किंवा अन्य कर्जाची परतफेड करण्यासाठी या रकमेचा उपयोग करायचा की अजून कोणत्या नव्या गुंतवणुकीत ही रक्कम गुंतवायची, हा विचार करून ठेवावा.

आपण गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंडाचा ‘एक्झिट लोड’चा नियम काय आहे, हे तपासून पाहावे. उदाहरणार्थ, गुंतवणुकीपासून सहा महिन्यांच्या आत विक्री केल्यास १ टक्का ‘एक्झिट लोड’ आकारला जाईल, असा नियम असेल तर या कालावधीत आपल्याला मिळणाऱ्या रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाईल, हे लक्षात ठेवावे.

इक्विटी फंडातील गुंतवणुकीच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत आपण फंडाची विक्री केली, तर सध्याच्या नियमानुसार मिळणाऱ्या नफ्याच्या १५ टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल.

याउलट एक वर्षानंतर विक्री केल्यास मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी पहिल्या एक लाख रुपयांवर काहीही प्राप्तिकर द्यावा लागत नाही आणि एक लाखापेक्षा अधिक नफ्यावर १० टक्के दराने प्राप्तिकर द्यावा लागेल, हेलक्षात ठेवावे. आपल्याला जेवढ्या पैशांची तातडीने गरज असेल, तेवढ्याच म्युच्युअल फंडाची विक्री (पार्शल रिडम्प्शन) करावी.

विक्रीचा निर्णय घेताना आपल्याकडील चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याऐवजी तुलनेने खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकावेत. इक्विटी फंडातील रक्कम बॅलन्स्ड फंडात किंवा डेट फंडात वळवून आपल्या गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्याच्या पर्यायाचादेखील विचार करावा. एसटीपी (सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) पर्यायाचा विचार करून एका फंडातून टप्प्याटप्प्याने दुसऱ्या फंडात प्रवेश करण्याचा विचार करावा.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपला निर्णय काहीही झाला तरी भविष्यात देखील चांगल्या म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक सुरु ठेवावी.

(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल येथे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT