Silver Price Hike Sakal
Personal Finance

Silver Price Hike: चांदीच्या भावात विक्रमी वाढ का झाली? गेल्या 3 महिन्यांत किंमत 30 टक्के पेक्षा जास्त वाढली

Silver Price Hike: 14 फेब्रुवारी 2024 रोजी चांदी 69,150 रुपये प्रति किलो होती आणि त्या पातळीपासून चांदीचे भाव 30 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. आणि येत्या काही दिवसांत चांदी 1 लाख रुपयांची पातळी ओलांडू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राहुल शेळके

Silver Price Hike: 2024 या वर्षात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मात्र चांदीच्या भावात झालेल्या प्रचंड वाढीचा फटका सोन्यालाही बसला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 23 मे 2024 रोजी चांदी 90,055 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 फेब्रुवारी 2024 रोजी चांदी 69,150 रुपये प्रति किलो होती आणि त्या पातळीपासून चांदीचे भाव 30 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. आणि येत्या काही दिवसांत चांदी 1 लाख रुपयांची पातळी ओलांडू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चांदीचे भाव का वाढत आहेत?

चांदीचा वापर दोन आघाड्यांवर होतो. लोक चांदीचे दागिने खरेदी करतात. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांदीमध्ये देखील गुंतवणूक करतात, म्हणून त्याकडे आर्थिक मालमत्ता म्हणून देखील पाहिले जाते. चांदीचा वापर औद्योगिक कारणांसाठीही केला जातो.

सोलर पॅनल बनवण्यासाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सरकारचे संपूर्ण लक्ष सौर ऊर्जेवर आहे. सौरऊर्जेपासून वीज निर्मितीला चालना दिली जात आहे. अशा स्थितीत आगामी काळात चांदीची मागणी वाढणार आहे.

वापरापेक्षा कमी उत्पादन

इलेक्ट्रिक कारपासून ते 5G सारख्या तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्टीत चांदी वापरली जात आहे. एका अंदाजानुसार, उद्योगात 60 टक्क्यांहून अधिक चांदी वापरली जाते. चांदीचा वापर वाढत आहे पण मागणीनुसार त्याचे उत्पादन घटले आहे. 2016 पासून, चांदीच्या खाणकामात सतत घट होत असून मागणीत मोठी वाढ झाली आहे.

चांदी एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते

अलीकडेच मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की सोन्यापेक्षा चांदीची वाढ अधिक होईल आणि ते सोन्यालाही मागे टाकेल. गेल्या 15 वर्षांत चांदीने सातत्याने 7 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. आणि जर चांदी देशांतर्गत बाजारात 1 लाख रुपयांची पातळी गाठू शकते, तर COMEX वर ते प्रति औंस 34 डॉलर पर्यंत जाऊ शकते. चांदीच्या दरातील वाढ इथेच थांबणार नसून त्याची चमक आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ला हटवून शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार का केलं? अजित आगरकरने खरं कारण सांगितलं

TRPमध्ये मोठी उलथापालथ! दुसऱ्या स्थानावर घसरण्यापासून थोडक्यात वाचली सायली; टॉप १० मध्ये नव्या मालिकेची एंट्री; वाचा रिपोर्ट

Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा

Nashik News : सिडकोत 'बॅनर हटाव' मोहीम! नवीन नाशिक महापालिकेची धडक कारवाई; शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यास सुरुवात

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी न्यायालयीन सुनावणीनंतर तुरुंगात

SCROLL FOR NEXT