Inflation  sakal
Personal Finance

Inflation : महागाईपासून जनतेला किंचित दिलासा

देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मार्चमधील ४.८५ टक्क्यांवरून तो ४.८३ टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मार्चमधील ४.८५ टक्क्यांवरून तो ४.८३ टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली. किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादित पट्ट्यात राहिला आहे.

या आकडेवारीनुसार, अन्नधान्याची महागाई एप्रिलमध्ये ८.७ टक्क्यांनी वाढली असून, मार्चमध्ये ती ८.५२ टक्के होती. भाजीपाला महागाईचा दर मार्चमधील २८.३० टक्क्यांवरून २७.८० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर डाळी आणि कडधान्यांच्या महागाईचा दर अनुक्रमे ८.६३ टक्के आणि १६.८४ टक्के नोंदवला गेला आहे.

इंधन आणि विजेचा महागाई दर एप्रिलमध्ये उणे ४.२४ टक्के झाला आहे. पाच प्रमुख श्रेणींमध्ये कपडे आणि पादत्राणे, गृहनिर्माण, इंधन आणि वीज या तीन श्रेणीतील वार्षिक महागाई गेल्या महिन्यापासून कमी झाली आहे. कपडे आणि पादत्राणे आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महागाई दर अनुक्रमे २.८५ टक्के आणि २.६८ टक्के होता, असे सांख्यिकी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT