Social media unicorn ShareChat fires 200 employees in another round of layoffs  Sakal
Personal Finance

ShareChat layoff: शेअरचॅटने एकाच वेळी 200 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

ShareChat layoff: कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण 15 टक्के आहे.

राहुल शेळके

ShareChat layoff: सोशल मीडिया कंपनी शेअरचॅटने एकाच वेळी 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण 15 टक्के आहे. ShareChat ही एक युनिकॉर्न कंपनी आहे. युनिकॉर्न म्हणजे त्या कंपनीचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या काही महिन्यांपासून न्यू एज इंटरनेट कंपन्यांच्या समस्या संपत नसल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ShareChat ने कर्मचाऱ्यांना का काढून टाकले?

कंपनीला पुढील चार ते सहा महिन्यांत खर्च कमी करायचा आहे, म्हणून कंपनी कर्मचारी कपातीच्या माध्यमातून खर्च कमी करत आहे. कंपनीने 20 डिसेंबर रोजी सांगितले की, "ShareChat ने 2024 साठी योजना तयार केली आहे. त्यामुळे कंपनीला आपला खर्च कमी करायचा आहे. आणि पुढील 4 ते 6 महिन्यांत नफा मिळवायचा आहे."

या वर्षाच्या सुरुवातीला शेअरचॅटने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हाही कंपनीने कॉस्ट कटिंगचा हवाला दिला होता. त्यावेळी भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

काही दिवसांपूर्वी थर्ड वेव्ह कॉफीने 100 ते 120 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. थर्ड वेव्ह कॉफी हा एक कॅफे ब्रँड आहे जो आपल्या ग्राहकांना खास कॉफी आणि खाद्यपदार्थ पुरवतो.

जगभरातील कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. अगोदर कोरोना लॉकडाऊन आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील वाढत्या अनिश्चिततेमुळे टेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. यामागे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीतील अडचण असल्याचेही सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

SCROLL FOR NEXT