ZEE-Sony Merger Sakal
Personal Finance

ZEE-Sony Merger: सोनीने झी सोबतचे विलीनीकरण केले रद्द; करार थांबवण्यासाठी कंपनीला पाठवले पत्र

ZEE-Sony Merger: सोनी ग्रुपने अधिकृतपणे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडला सांगितले आहे की ते त्यांचे भारतीय युनिट विलीन करण्याची योजना रद्द करण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गने सोमवारी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली.

राहुल शेळके

ZEE-Sony Merger: सोनी ग्रुपने अधिकृतपणे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडला सांगितले आहे की ते त्यांचे भारतीय युनिट विलीन करण्याची योजना रद्द करण्याचा विचार करत आहेत. ब्लूमबर्गने सोमवारी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही कंपन्यांमध्ये विलीनीकरणासाठी सुरू असलेले सर्व प्रयत्न संपुष्टात आले आहेत. अहवालानुसार, जपानची आघाडीची मनोरंजन कंपनी सोनीने सोमवारीच ZEE ला एक टर्मिनेशन लेटर पाठवले आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोनीने विलीनीकरण कराराच्या अटींची पूर्तता केली नाही. सध्याचे झीचे सीईओ पुनित गोएंका यांच्या भूमिकेबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये मतभेद होते.

विलीनीकरणानंतर स्थापन होणार्‍या नवीन संस्थेचे नेतृत्व पुनित गोयंका यांच्याकडे असेल यावर आधी दोन्ही कंपन्यांमध्ये सहमती झाली होती. मात्र, आता पुनित गोयंका यांची सेबीच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर सोनी यासाठी तयार नाही. दोन कंपन्यांमधील विलीनीकरणाचा करार तुटण्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

जर हे विलीनीकरण झाले असते, तर Zee आणि Sony ने सुमारे 10 अब्ज डॉलर मुल्यांकन असलेली एक मोठी मीडिया कंपनी तयार झाली असती.

विलीनीकरणाचा करार 21 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होता

हा विलीनीकरणाचा करार 21 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होता. करारानुसार तीन वेळा मुदतवाढ घेण्यात आली. झीने डिसेंबरमध्ये मुदतवाढ मागितली होती. यानंतर सोनीने विलीनीकरणाची तारीख वाढवण्याची तयारी दर्शवली होती.

नवीन कंपनीचे नेतृत्व कोण करणार हा मुद्दा होता. प्लॅननुसार, पुनित गोयंका हे नवीन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बनणार होते. परंतु जून 2023 मध्ये सेबीने पुनित गोएंका आणि सुभाष चंद्रा यांना कोणत्याही कंपनीचे बोर्ड मेंबर बनण्यास बंदी घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT