Sovereign Gold Bond Scheme 2023-24 New series opens for subscription at rs 6,263/gm Sakal
Personal Finance

Sovereign Gold Bond: आजपासून 16 फेब्रुवारीपर्यंत स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, किती आहे किंमत?

Sovereign Gold Bond Scheme 2023-24: तुम्हालाही स्वस्त सोने खरेदी करायचे असेल, तर सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2023-24 आज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB) 2023-24 मालिका IV आज सुरु होणार आहे.

राहुल शेळके

Sovereign Gold Bond Scheme 2023-24: तुम्हालाही स्वस्त सोने खरेदी करायचे असेल, तर सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2023-24 आज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB) 2023-24 मालिका IV आज सुरु होणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात. सरकारने बाँड इश्यूची किंमतही जाहीर केली आहे. हा बाँड 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत जारी केला जाईल.

SGB ​​मालिका IV 2023-24

खरेदीची तारीख: 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024

जारी करण्याची तारीख: 21 फेब्रुवारी 2024

SGB ​​2023-24 मालिका IV च्या सरकारने निश्चित केलेल्या किंमती

सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना मालिकेची किंमत जाहीर केली आहे. सरकारने एका ग्रॅमची किंमत 6,263 रुपये निश्चित केली आहे. ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही 50 रुपये वाचवू शकता. ऑनलाइन पेमेंट केल्यावर इश्यूची किंमत 6,213 रुपये असेल. सध्या बाजारात एक ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 6,300 रुपये आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना काय आहे?

सरकारच्या या योजनेंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही सरकारी योजना आहे. ज्यामध्ये भारत सरकार गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी देते. हा बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चालवत आहे. तुम्ही हे कोणत्याही बँकेतून खरेदी करू शकता. तुम्ही ते नेट बँकिंगद्वारेही खरेदी करू शकता.

तुम्ही किती सोने खरेदी करू शकता?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. तसेच जास्तीत जास्त 4 किलो सोने वैयक्तिक, 4 किलो हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि 20 किलो ट्रस्टच्या नावावर जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाऊ शकते.

तुम्ही येथून सोने खरेदी करू शकता

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) कडून खरेदी केली जाऊ शकते. याशिवाय नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड कडून देखील घेता येईल.

इतके व्याज मिळते

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. 5 व्या वर्षी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याज मिळते. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2015 मध्ये सुरू झाली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT