Sovereign Gold Bond sbi Sakal
Personal Finance

Sovereign Gold Bond: स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस

Sovereign Gold Bond Scheme: बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करु शकता.

राहुल शेळके

Sovereign Gold Bond Scheme: तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) हा एक उत्तम पर्याय आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास सोन्याच्या किंमतीत वाढ आणि व्याज या दोन्हींचा फायदा मिळतो.

भारत सरकारने हे रोखे जारी केले आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2023-24- मालिका II 11 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली आणि गुंतवणूकदार आज 15 सप्टेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतात. तुम्ही SBI चे खातेदार असाल तर सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करून हे रोखे खरेदी करु शकता.

आज गुंतवणुकीचा शेवटचा दिवस

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,923 रुपये आहे. ऑनलाइन पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूटही मिळेल. म्हणजेच एक ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 5,873 रुपये मोजावे लागतील.

बाजारातील सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 59,000 रुपयांच्या आसपास आहे. तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळत आहे.

गुंतवणूक कशी करावी

  • तुमच्या SBI ऑनलाइन बँकिंग खात्यात लॉग इन करा.

  • त्यानंतर 'eServices' टॅबवर क्लिक करा आणि 'Sovereign Gold Bond' वर जा.

  • 'अटी आणि नियम' निवडा आणि नंतर start वर क्लिक करा

  • सूचनांनुसार अर्ज करा. नोंदणी पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला खरेदी करायचे असलेले सोन्याचे प्रमाण आणि नॉमिनीच्या तपशीलासह खरेदी फॉर्म भरा.

  • शेवटी, 'सबमिट' वर क्लिक करा.

  • SBI व्यतिरिक्त, ICICI बँक, PNB आणि कॅनरा बँकेत नेट बँकिंगद्वारे सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी केले जाऊ शकतात.

इतके व्याज मिळते

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. 5 व्या वर्षी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याज मिळते. त्याचे पेमेंट दर 6 महिन्यांनी केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT