Sovereign Gold Bonds 2023-24 Series IV opens on February 12 Know details  Sakal
Personal Finance

Sovereign Gold Bond: स्वस्त सोने घ्यायचे असेल तर पैसे ठेवा तयार; मोदी सरकारची सुवर्ण योजना 'या' तारखेला होणार सुरू

Sovereign Gold Bond: सध्या लग्नसराई चालू आहे. सोन्याचा भाव 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे लोकांना हवे असले तरी सोने विकत घेता येत नाही. जर तुम्ही किंमतीमुळे सोने खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

राहुल शेळके

Sovereign Gold Bond: सध्या लग्नसराई चालू आहे. सोन्याचा भाव 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे लोकांना हवे असले तरी सोने विकत घेता येत नाही. जर तुम्ही किंमतीमुळे सोने खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

पुढील आठवड्यापासून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही मोदी सरकारच्या गोल्ड स्कीम अंतर्गत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. (Sovereign Gold Bonds 2023-24 Series IV opens on February 12 Know details)

सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB)

सॉव्हरिन गोल्ड बाँड हे सरकारी रोखे आहेत. ते आरबीआय जारी करते. हा बाँड 1 ग्रॅम सोन्याचा असतो म्हणजेच 1 ग्रॅम सोन्याची किंमत ही बाँडची किंमत असते. सॉव्हरिन गोल्ड बाँडद्वारे, तुम्ही 24 कॅरेटच्या 99.9 % शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 6,213 रुपये असेल असे आरबीआयने म्हटले आहे. (Sovereign Gold Bond price fixed at Rs 6,263/gm; issues opens Monday)

ऑनलाइन अर्ज केल्यावर आणि डिजिटल पेमेंट केल्यास, प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट आहे. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करु शकते.

गोल्ड बाँड कुठे खरेदी करायचे

  • बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता

  • तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही ते खरेदी करू शकता

  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करता येईल

  • बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे.

SGB ​​मध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?

  • यावर तुम्हाला वार्षिक 2.4 टक्के व्याज मिळते, जे दर सहा महिन्यांनी दिले जाते.

  • बाजारात सोन्याची किंमत वाढली की तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यही वाढते.

  • सुरक्षेची चिंता नाही.

  • जीएसटीच्या कक्षेत येत नाही, भौतिक सोन्यावर 3% जीएसटी लावला जातो.

  • बॉण्डद्वारे कर्जाचा पर्यायही उपलब्ध आहे.

  • शुद्धतेची कोणतीही अडचण नाही, कारण ते कागदी असल्याने आपल्याला त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

  • मुदतपूर्तीनंतर तुम्हाला सोन्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

  • ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT