Spotify to Lay Off 17 percent of Staff, Its Third Round of Job Cuts This Year  Sakal
Personal Finance

Spotifyमध्ये वर्षातील सर्वात मोठी कर्मचारी कपात; 'इतक्या' कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी, काय आहे कारण?

Spotify Layoffs: म्युझिक कंपनी Spotify ने सोमवारी कंपनीतील सुमारे 17% कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली.

राहुल शेळके

Spotify Layoffs: म्युझिक कंपनी Spotify ने सोमवारी कंपनीतील सुमारे 17% कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली. स्पॉटिफाईचे संस्थापक आणि सीईओ डॅनियल ऍक यांनी सांगितले की कमी आर्थिक वाढ आणि वाढीव भांडवली खर्च ही कर्मचारी कपातीची कारणे आहेत.

डॅनियल ऍक म्हणाले की मी कंपनीतील माझ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 17% ने कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की ज्यांनी अमूल्य योगदान दिले आहे अशा व्यक्तींवर याचा परिणाम होईल.

अनेक हुशार आणि मेहनती लोक आपल्याला सोडून जातील. TechCrunch च्या मते, Spotify अंदाजे 8,800 लोकांना रोजगार देते आणि या निर्णयामुळे 1,500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.

सीईओ डॅनियल ऍक यांनी सांगितले की कंपनी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना मदत करेल. कर्मचाऱ्यांना येत्या काही तासांत याची माहिती दिली जाईल आणि कंपनी पुढील पाच महिन्यांचे सरासरी पेमेंट सेव्हरेन्स पे कर्मचाऱ्यांना देईल.

ही रक्कम कर्मचाऱ्यांचे काम आणि नोटीस कालावधीच्या आधारे मोजली जाईल. या पाच महिन्यांत त्यांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्चाचीही काळजी घेतली जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.

डॅनियल ऍक यांनी माहिती दिली की, कोरोना काळात कंपनीने 2020 आणि 2021 मध्ये बाजारातून कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगवर खर्च केला होता. मात्र यानंतर बदलत्या परिस्थितीनुसार कर्ज महाग झाले आणि त्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढू लागल्या.

अशा परिस्थितीत, कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT