Star Health Insurance Data Leak Sakal
Personal Finance

Star Health Insurance: स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या ग्राहकांनो सावधान! करोडो लोकांचा डेटा झाला लीक

Star Health Insurance Data Leak: स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सच्या करोडो ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीच्या सुमारे 3.1 कोटी पॉलिसीधारकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा केला जात आहे. हॅकर्सनी चॅटबॉटद्वारे टेलिग्रामवर हा डेटा उपलब्ध करून दिला आहे.

राहुल शेळके

Star Health Insurance Data Leak: स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सच्या करोडो ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीच्या सुमारे 3.1 कोटी पॉलिसीधारकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा केला जात आहे. हॅकर्सनी चॅटबॉटद्वारे टेलिग्रामवर हा डेटा उपलब्ध करून दिला आहे. या डेटामध्ये ग्राहकांशी संबंधित संवेदनशील माहिती आहे.

मात्र डेटा चोरीची ही घटना मोठी नसल्याचे स्टार हेल्थने म्हटले आहे. याबाबत ते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अलीकडेच टेलीग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांना गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

रॉयटर्सच्या अहवालाचा हवाला देत मिंटने म्हटले आहे की या चॅटबॉट्सच्या निर्मात्याने स्टार हेल्थच्या डेटाची माहिती ब्रिटिश सुरक्षा संशोधक जेसन पार्करला दिली होती. त्यांनी ही माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. रिपोर्टनुसार, पॉलिसीधारकांची वैयक्तिक माहिती टेलिग्रामच्या माध्यमातून विकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रॉयटर्सने ते डाउनलोड देखील केले आहेत. यामध्ये पॉलिसीधारकांची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ते, कर तपशील, ओळखपत्र आणि वैद्यकीय परिस्थिती याविषयी माहिती आहे. दुसरीकडे, कंपनीने ग्राहकांचा डेटा सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

चॅटबॉट्सच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यात टेलिग्रामला अपयश

टेलीग्राम हे जगातील सर्वात मोठे मेसेंजर ॲप आहे. त्याचे सुमारे 90 कोटी युजर आहेत. चॅटबॉट्सच्या माध्यमातून होणाऱ्या या गुन्ह्यांना आळा घालण्यात कंपनी अयशस्वी ठरत आहे. याशिवाय भारतीय कंपन्यांच्या डेटा सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जेसन पार्करने डेटा खरेदीदार म्हणून xenZen नावाच्या हॅकरशी संपर्क साधला. त्यांच्याकडे 7.24 टेराबाइट्स डेटा असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा डेटा त्या हॅकरपर्यंत कसा पोहोचला हे सध्यातरी समोर आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT