subramanian swamy pil  Sakal
Personal Finance

SEBI Chief: भाजप नेत्याने केली सेबी प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

Hindenburg Report: हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय संघर्ष सुरू आहे आणि मोदी सरकारवर सतत टीका होत आहे. सेबी प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असतानाच भाजपने ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

राहुल शेळके

Hindenburg Research Report: हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय संघर्ष सुरू आहे आणि मोदी सरकारवर सतत टीका होत आहे. सेबी प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असतानाच भाजपने ते निराधार असल्याचे म्हटले आहे. सेबीने हिंडेनबर्गचा अहवाल पूर्णपणे फेटाळला असला तरी विरोधक तो मानायला तयार नाहीत.

दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही हा मुद्दा उपस्थित करत सेबीच्या प्रमुखपदी प्रामाणिक व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना हटवण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडिया 'एक्स'वर एका पोस्टमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, सेबीच्या अध्यक्षांविरुद्ध हितसंबंधांच्या संघर्षाचे प्रकरण दुसऱ्यांदा उपस्थित करण्यात आले आहे. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताची प्रतिमा वाचवण्यासाठी त्यांच्या जागी प्रामाणिक व्यक्ती आणली पाहिजे. सुब्रमण्यम स्वामी यांनी जनहित याचिका (पीआयएल) सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीवर अदानी समूहाशी संबंधित विदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला होता. सेबी प्रमुखांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे तर अदानी समूहाने बुचशी कधीही व्यावसायिक संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सेबीने सांगितले की, हिंडेनबर्गचे दावे निराधार आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. अदानी समूहाने सर्व नियमांचे पालन केले असून कंपनीविरुद्ध अनियमिततेचे कोणतेही प्रकरण नाही. यासोबतच सेबीने गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे सांगितले आहे.

हिंडेनबर्गने अदानी समूहावर कोणते आरोप केले?

यापूर्वी हिंडनबर्गने अदानी समूहाने आपल्या खात्यांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप केला होता आणि कंपनीची खरी स्थिती लपवण्याचा प्रयत्न केला होता. अदानी कुटुंब वैयक्तिक फायद्यासाठी कंपनीच्या संसाधनांचा वापर करत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT