sudha murthy says to husband narayana murthy is corporate gandhi but she is not kasturba  Sakal
Personal Finance

हे कॉर्पोरेट गांधी आहेत, पण मी... सुधा मूर्तींनी केलं नारायण मूर्तींच्या 70 तासाच्या कामाचे समर्थन

Narayana Murthy: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सुधा मूर्ती यांनी समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या की, मी आजही 70 तासांपेक्षा जास्त काम करते.

राहुल शेळके

Narayana Murthy: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तासांच्या वक्तव्याने देशभरात चर्चा रंगली होती. नारायण मूर्ती यांच्या या विधानाचे कुणी समर्थन केले तर कुणी असहमती व्यक्त केली.

दरम्यान नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबतच्या वक्तव्याचे सुधा मूर्ती यांनी समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या की, मी आजही 70 तासांपेक्षा जास्त काम करते.

सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांच्यातील नातेसंबंध आणि त्यांच्यातील प्रेमाचे उदाहरण देताना सांगितले की, नारायण मूर्ती हे कॉर्पोरेट गांधी आहेत. पण मी कस्तुरबा नाही. सुधा मूर्ती म्हणाल्या की, 1974 मध्ये जेव्हापासून ते त्यांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हापासून त्या नारायण मूर्ती यांना 'मूर्ती' या नावाने संबोधतात. इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी हे वक्तव्य केले आहे.

सुधा मूर्ती म्हणाल्या की, नारायण मूर्ती यांचा कठोर परिश्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आला आहे, कारण ते नेहमीच प्रयत्न करण्याच्या तत्त्वावर ठाम राहिले आहेत. दरम्यान, नारायण मूर्ती म्हणाले की, कंपनीला स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी आठवड्यातून 85 ते 90 तास काम केले. यानंतरही त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला.

नारायण मूर्तींनी काय सल्ला दिला होता?

नारायण मूर्ती यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, जर भारताचा वेगाने विकास करायचा असेल तर तरुणांना दर आठवड्याला 70 तास काम करावे लागेल, हे आठवड्यातून 6 दिवस म्हणजे दररोज सुमारे 12 तास काम करावे लागेल.

या विधानानंतर देशात जोरदार चर्चा सुरू झाली. काही लोक नारायण मूर्ती यांच्या विचारांशी सहमत होते तर काहींनी विरोध केला. काहींनी असे सांगितले की, कामाच्या वेळेवर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

जपानचे उदाहरण देताना नारायण मूर्ती म्हणाले होते की, दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्र उभारणीसाठी अथक परिश्रम केल्यामुळेच जपान इतक्या वेगाने प्रगती करू शकला. जास्त तास काम करण्याच्या बाबतीत भारत जगातील सर्वात कमी देशांपैकी एक आहे. यासाठी तरुणांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT