Provident Fund
Provident Fund sakal
Personal Finance

स्मार्ट सल्ला : अल्पबचत योजनांतील हितावह बदल

सुधाकर कुलकर्णी

केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे सात नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सिनियर सिटीझन्स सेव्हिंग्स स्कीम) व पोस्टाची पाच वर्षे मुदत ठेव (पीओटीडी) या तीन योजनांमध्ये काही आमूलाग्र बदल केले आहेत.

१) पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करताना याआधी खाते उघडल्यापासून किंवा १५ वर्षांची मुदत संपल्यावर पाच वर्षांसाठी वाढविले असल्यास, सुरुवातीपासून ज्या दराने वेळोवेळी व्याज दिले असेल, त्याच्या एक टक्का इतकी पेनल्टी (दंड ) लावली जात असे. आता मुदतीआधी खाते बंद करताना ही पेनल्टी सुरुवातीपासून न लावली जाता, सध्या चालू असलेल्या पाच वर्षांच्या ब्लॉकच्या सुरुवातीपासून जो व्याजदर दिला आहे, त्याच्या एक टक्का इतकी पेनल्टी लावली जाणार आहे. यामुळे मुदतपूर्व खाते बंद करताना कमी नुकसान होणार आहे. कारण लागणारी पेनल्टी संपूर्ण कालावधीसाठी न लागता केवळ सध्या चालू असलेल्या पाच वर्षांच्या ब्लॉकच्या सुरुवातीपासूनच लागेल.

२) अ) ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूक करताना या आधी सेवानिवृत्त व्यक्ती (ज्याचे वय ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे.) आपल्या सेवानिवृत्तीचे पेमेंट (पीएफ, ग्रॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट) मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत गुंतवणूक करणे आवश्यक होते. ही मुदत आता ९० दिवस केली आहे. (संरक्षण (डिफेन्स) खात्यातून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस वयाची अट ५० वर्षे आहे.) तसेच मृत व्यक्तीच्या पती किंवा पत्नीस मिळणारी आर्थिक मदत आता यात गुंतविता येणार आहे.

ब) खाते एक वर्षाच्या आत बंद करता येईल. मात्र, त्यासाठी एकूण ठेव रकमेच्या एक टक्का इतकी कपात करून उर्वरित रक्कम दिली जाईल.

क) मुदतीनंतर खाते तीन वर्षांसाठी कितीही वेळा ‘रिन्यू’ (नूतनीकरण) करता येईल. याआधी खाते फक्त एकदाच तीन वर्षांसाठी ‘रिन्यू’ करता येत होते. खाते ‘रिन्यू’ करताना मूळ मुदत संपताना किंवा तीन वर्षांची वाढीव मुदत संपताना योजनेस लागू असलेल्या दराने व्याज मिळेल.

ड) प्रारंभिक पाच वर्षांच्या मुदतीनंतर अथवा तीन वर्षांच्या वाढीव मुदतीनंतर खाते बंद केले असेल आणि पुन्हा गुंतवणूक करावयाची असेल तर कमाल मर्यादेपर्यंत करता येईल. (सध्या कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० लाख रुपये आहे.)

३) पोस्टाची पाच वर्षे मुदत ठेव (पीओटीडी) योजनेतील रक्कम चार वर्षानंतर काढल्यास बचत खात्यास मिळत असणाऱ्या दराने व्याज मिळणार आहे. सध्या या योजनेस पाच वर्षांसाठी ७.५ टक्के दराने व्याज दिले जाते. खाते चार वर्षानंतर; परंतु, पाच वर्षांच्या आत बंद केले, तर सध्या पोस्टाच्या बचत खात्यास असणाऱ्या चार टक्के दराने व्याज मिळेल.

हे सर्व बदल गुंतवणूकदारांच्या हिताचे आहेत.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT