sukanya samriddhi yojana best investment plan for girl future Sakal
Personal Finance

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीचे आहेत अनेक फायदे; मुलीच्या जन्मानंतर तात्काळ करा सुरु

या योजनेत तुम्ही वार्षिक 250 रुपये ते 1.5 लाख जमा करू शकता. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते उघडू शकता.

सकाळ वृत्तसेवा

Sukanya Samriddhi Yojana : मुलाचा जन्म होताच पालकांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटू लागते. त्यात जर तुम्ही मुलीचे पालक असाल तर तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतची चिंता वाढते. अशात सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana-SSY) मुलींचे भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

या योजनेत तुम्ही वार्षिक 250 रुपये ते 1.5 लाख जमा करू शकता. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते उघडू शकता. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती 21 वर्षात मॅच्युअर होते. जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले तर वयाच्या 21 व्या वर्षी तुम्ही तिच्यासाठी 70 लाखांचा मोठा फंड तयार करु शकता.

सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर 1.5 लाख जमा केले तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवणुक करावे लागतील. 15 वर्षात एकूण 22 लाख 50 हजारांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे.

21 वर्षांच्या मॅच्युरिटी वेळी एकूण 46 लाख 77 हजार 578 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा परिस्थितीत, मॅच्युरिटीवर मुलीला एकूण 22,50,000 रुपये 46,77,578 = रुपये 69,27,578 (सुमारे 70 लाख रुपये) मिळतील.

सुकन्या समृद्धी योजनेत 2024 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ही योजना 2045 मध्ये मॅच्युअर होईल, म्हणजेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे 2045 पर्यंत मिळतील. सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा,

1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT