Suzlon Energy  Sakal
Personal Finance

Suzlon Energy : सुझलॉन एनर्जीला या आर्थिक वर्षासाठीची पहिली ऑर्डर, शेअर्स 5% तेजीसह अपर सर्किटवर...

विंड टर्बाइनचे उत्पादन करणाऱ्या एमएनसी सुझलॉन एनर्जीला ज्युपिटल ग्रीन एनर्जीकडून 3 मेगावॅटच्या 402 मेगावॅटची नवीन ऑर्डर मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Suzlon Energy : सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) शेअर्समध्ये येत्या काही काळात जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळेल. कंपनीने या आर्थिक वर्षात पहिल्यांदा मिळालेल्या ऑर्डरची माहिती दिली. याआधी, मार्चमध्ये एक्सचेंज फायलिंगमध्ये शेवटच्या वेळी ऑर्डरचा खुलासा करण्यात आला होता.

त्यामुळे बुधवारी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स अपर सर्किटपर्यंत पोहोचले. या वाढीचा फायदा काही गुंतवणूकदारांनी घेतला पण किमती फारशी घसरल्या नाहीत. प्रॉफीट बुकिंग असूनही, दिवसअखेर तो बीएसईवर 4.38 टक्क्यांच्या वाढीसह 45.96 रुपयांवर बंद झाला.

इंट्रा-डेमध्ये तो 5 टक्क्यांनी वाढला आणि 46.23 रुपयांच्या अपर सर्किटवर पोहोचला. गेल्या वर्षी 23 मे 2023 रोजी तो 9.15 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या पातळीपासून ते 9 महिन्यांत 454 टक्क्यांहून अधिक वाढला आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी 50.72 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला.

विंड टर्बाइनचे उत्पादन करणाऱ्या एमएनसी सुझलॉन एनर्जीला ज्युपिटल ग्रीन एनर्जीकडून 3 मेगावॅटच्या 402 मेगावॅटची नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. या ऑर्डरनुसार, सुझलॉनला 3 मेगावॅट क्षमतेचे 134 विंड टर्बाइन जनरेटर्स (WTGs) सप्लाय आणि इंस्टॉल करायचे आहे.

सुझलॉन त्यांचे ऑपरेशन आणि मेंटेन्ससही करेल. हा प्रोजेक्ट राजस्थानमधील फतेहगडचा असून तो पूर्ण झाल्यानंतर सुमारे 3.3 लाख कुटुंबांना वीज मिळू शकणार आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे दरवर्षी 13 लाख टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही कमी होणार आहे. जुनिपरने यापूर्वीच सुझलॉनला प्रोजेक्ट दिला आहे.

सुझलॉनला जुनिपरकडून मिळालेली ऑर्डर ही या आर्थिक वर्षातील पहिलीच ऑर्डर आहे. यापूर्वी, कंपनीने 7 मार्चला आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नवीन ऑर्डरची माहिती दिली होती. ज्युनिपर ग्रीन एनर्जीकडूनही ही ऑर्डर मिळाली आहे. याअंतर्गत कंपनीला गुजरातमधील द्वारकात 72.45 मेगावॅटच्या विंड पॉवर प्रोजेक्टवर काम करायचे होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT