Swiggy deliveres 6 million plates of Biryani this Ramzan, up by 15 percent
Swiggy deliveres 6 million plates of Biryani this Ramzan, up by 15 percent  Sakal
Personal Finance

Swiggy Order: रमजानच्या पवित्र महिन्यात स्विगीमधून 'या' पदार्थाला सर्वाधिक मागणी; कोणते शहर आघाडीवर?

राहुल शेळके

Eid Mubarak 2024: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने बुधवारी सांगितले की त्यांना रमजानच्या पवित्र महिन्यात सुमारे 60 लाख बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. इतर महिन्यांच्या तुलनेत (12 मार्च ते 8 एप्रिल) बिर्याणीच्या 15 टक्के जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. बिर्याणीच्या 10 लाख प्लेट्स आणि हलीमच्या 5.3 लाख प्लेट्सची ऑर्डर देऊन हैदराबाद अव्वल स्थानावर आहे

हलीम आणि समोसा सारख्या पारंपारिक पदार्थांनी वर्चस्व कायम ठेवले आहे, स्विगीने रमजानच्या काळात संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेत ऑर्डरमध्ये 34 टक्क्यांनी वाढ झाली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय स्तरावर ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये चिकन बिर्याणी, मटन हलीम, समोसा, फालूदा आणि खीर यांचा समावेश आहे. रमजानच्या काळात, इतर दिवसांच्या तुलनेत देशभरातील लोकप्रिय पदार्थांच्या ऑर्डरमध्ये वाढ झाली होती. हलीममध्ये 1454.88 टक्के वाढ झाली, त्यानंतर खीरमध्ये 80.97 टक्के वाढ झाली.

मालपुआ ऑर्डर 79.09 टक्क्यांनी वाढल्या, तर फालूदा आणि खजूरमध्ये अनुक्रमे 57.93 टक्के आणि 48.40 टक्के वाढ झाली. मुंबई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, भोपाळ आणि मेरठ सारख्या शहरांमध्ये रमजानच्या काळात मालपुआ, खजूर आणि खीरसह गोड पदार्थांच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

स्विगी IPO लाँच करण्याच्या तयारीत

स्विगी IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपला IPO लॉन्च करू शकते. याआधी कंपनीने निधी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी सध्याच्या मूल्यांकनापेक्षा 20 टक्के कमी किमतीत शेअर्स खरेदी करण्यासाठी हाय नेट वर्थ व्यक्तींना (HNIs) ऑफर देत आहे.

कंपनी HNIs ला 80 हजार कोटी ($960 कोटी) च्या मुल्यांकनानुसार 350 रुपयांच्या किमतीत ऑफर केली जात आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की सवलत 20 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते.

श्रीमंत गुंतवणूकदारांनी Zomato IPO मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले

स्विगी आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, तर तिचा प्रतिस्पर्धी झोमॅटोने सुमारे तीन वर्षांपूर्वी आयपीओ लॉन्च केला होता. त्याचा 9375 कोटी रुपयांचा IPO 14 जुलै ते 16 जुलै 2021 दरम्यान उघडण्यात आला. हा IPO एकूण 38.25 पट सबस्क्राईब झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT