Indian Players Brand Valuation Sakal
Personal Finance

T20 World Cup 2024: भारतीय खेळाडू होणार मालामाल; ब्रँड व्हॅल्यूमध्ये झाली मोठी वाढ, असा पडणार पैशांचा पाऊस

Indian Players Brand Valuation: टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने 125 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

राहुल शेळके

Indian Players Brand Valuation: टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने 125 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत देशभरातील आणि जगभरातील कंपन्यांनीही या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव सुरू केला आहे.

विशेष बाब म्हणजे विश्वविजेत्या संघाची एकत्रित ब्रँड व्हॅल्यू सर्व विक्रम मोडू शकते. हा संघ एकटाच आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूशी स्पर्धा करताना दिसत आहे. T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या रोहित आणि विराटची ब्रँड व्हॅल्यू दुपटीने वाढू शकते.

गुंतवणूक बँक हौलिहान लोके यांच्या मते, आयपीएलचे मूल्य 16.4 अब्ज डॉलर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवृत्त होणारे टी-20 खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या ब्रँड डील जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

ते म्हणाले की, शनिवारी चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्य कुमार यादव, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, शिवम दुबे यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मूल्यांकनात किमान 50-70 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

शनिवारी रात्रीपासूनच विविध क्षेत्रातील कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीमचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्यांच्या अधिका-यांनी सांगितले की, रविवारी सकाळपासून ब्रँडच्या जाहिरातींसाठी विशेषत: बुमराह, पांड्या आणि यादव यांच्यासाठी चौकशी वाढू लागली आहे.

ॲजिलिटास स्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक गांगुली यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, या सर्व खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. गांगुली म्हणाले की, अनेक नवीन खेळाडू छोट्या शहरातून आणि सामान्य पार्श्वभूमीतूनही येत आहेत.

गांगुली म्हणाले की, काही वर्षांपूर्वी केवळ काही खेळाडूच अशा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असत. यावेळी मात्र तसे नाही. संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे.

कोहलीचा पुमासोबत 110 कोटी रुपयांचा करार

गांगुली जवळजवळ एक दशकभर जर्मन स्पोर्ट्सवेअर उत्पादक पुमाच्या भारतीय युनिटचे व्यवस्थापकीय संचालक होते. ज्यांनी डझनभर क्रिकेटपटूंना स्पॉन्सर केले आहे. ज्यामध्ये टीमचा आयकॉन विराट कोहलीसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. कोहलीचा पुमासोबत 110 कोटी रुपयांचा करार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT