Taj Hotel Data Breach IHCL begins probe as report suggests data leak of 1.5 million customers  Sakal
Personal Finance

Taj Hotel: ताज हॉटेल्सच्या सुमारे 15 लाख ग्राहकांचा डेटा लीक, हॅकरने मागितली 'इतक्या' लाखांची खंडणी

Taj Hotel Data Breach: कंपनी डेटा लीकची चौकशी करत आहेत.

राहुल शेळके

Taj Hotel Data Breach: टाटांची मालकी असलेल्या ताज हॉटेलचा डेटा लीक झाला आहे. अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या डेटा लीकमध्ये सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख लोकांचा डेटा होता. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, ताज समूह चालवणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) ने सांगितले की कंपनी डेटा लीकची चौकशी करत आहेत.

या डेटा लीक प्रकरणात, कंपनीकडून 5,000 डॉलरची खंडणी देखील मागितली गेली आहे. ‘Dnacookies’ नावाने ट्विटर हँडल चालवणाऱ्या व्यक्तीने ही खंडणी मागितली आहे. लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांचा डेटा, मेंबरशिप आयडी, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश होता.

ताज ग्रुपचे व्यवस्थापन करणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या प्रवक्त्याने CNBC-TV18 ला सांगितले की, "काही ग्राहकांचा डेटा ताब्यात असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची आम्हाला माहिती आहे."

डेटा हॅकरचा दावा आहे की त्याच्याकडे 2014 ते 2020 या कालावधीतील डेटा आहे आणि तो आतापर्यंत कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. व्यक्तीने त्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ एक नमुना देखील जाहीर केला आहे.

आयएचसीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी या दाव्याची चौकशी करत आहे आणि हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ला देखील या डेटा लीकची माहिती आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT