Tata Group Sakal
Personal Finance

Tata Group: परदेशी शिक्षणासाठी TATA करणार मदत; 'इतक्या' लाखांपर्यंत देणार शैक्षणिक कर्ज

Tata Group: टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज योजना दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Tata Group: टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज योजना दाखल केली आहे.

भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर आणि दुबईमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कर्ज मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षित कर्ज किंवा शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्चाची रक्कम कर्जरुपाने मिळेल. टाटा कॅपिटल विद्यार्थ्यांना प्रवेश-पूर्व मंजुरी पत्र देते, त्यामुळे त्यांना प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत मिळते.

स्पर्धात्मक व्याजदरांव्यतिरिक्त टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना कर्ज परतफेडीचे लवचिक पर्याय मिळतात, त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासाच्या काळात परतफेड करणेही सोपे जाते. कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो, ही प्रक्रियाही सहजसुलभ असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

या योजनेविषयी माहिती देताना कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी विवेक चोपडा म्हणाले, ‘‘विश्वास आणि पारदर्शकता हे नेहमीच आमच्या व्यवसायाचे सर्वांत मजबूत आधारस्तंभ आहेत. पारंपरिक आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक कर्जामध्ये ट्युशन फीपासून प्रवास आणि वैद्यकीय खर्चापर्यंतच्या सर्व पैलूंचा समावेश आहे.

उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT