Tata Electronics to create 72000 jobs in India N chandrasekaran Sakal
Personal Finance

Tata Electronics : ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’मुळे ७२ हजार नोकऱ्यांची संधी

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ९१ हजार कोटी रुपये खर्चाच्या चिप उत्पादन प्रकल्पाचे आणि २७ हजार कोटी रुपयांच्या चिप असेंब्ली सुविधेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

धोलेरा : टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि सुमारे ७२ हजार नोकऱ्या निर्माण करतील, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आज येथे सांगितले.

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ९१ हजार कोटी रुपये खर्चाच्या चिप उत्पादन प्रकल्पाचे आणि २७ हजार कोटी रुपयांच्या चिप असेंब्ली सुविधेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ‘‘या प्रकल्पांची ही सुरुवात आहे, हळूहळू याचा विस्तार होईल. येथे ५० हजार नोकऱ्या आणि आसाममध्ये किमान २० ते २२ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील,’’ असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले.

या प्रकल्पात २८ नॅनोमीटर ते ११० नॅनोमीटरच्या चिप तयार करण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘‘कॅलेंडर वर्ष २०२६च्या उत्तरार्धात चिपचे उत्पादन करणे आमचे उद्दिष्ट आहे. आसाममध्ये २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीस उत्पादन सुरू करू शकतो.’’असेही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Mumbai Metro: बेस्टनंतर मेट्रोचा पुढाकार! गणेशोत्‍सवात रेल्‍वे मध्यरात्रीपर्यंत धावणार; पहा वेळापत्रक

Ganesh Festival 2025 : धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद; गणेशोत्सवानिमित्त भाविकांकडून पूजा साहित्य संचाला विशेष मागणी

Crime News : नाशिकमध्ये गटबाजीचा राडा; माजी नगरसेवक उद्धव निमसेंसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna Water Supply: लघुपाटबंधारे विभाग, मनपाच्या गोंधळाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ‘घाणेवाडी’च्या सुरक्षा भिंतीचे निखळले पिचिंग

SCROLL FOR NEXT