Tata-Bisleri Deal  Sakal
Personal Finance

Tata-Bisleri Deal : टाटा ग्रुपचा बिस्लेरीसोबतचा करार रखडला! काय आहे कारण?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बिसलेरी आणि टाटा यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचली होती.

सकाळ डिजिटल टीम

Tata-Bisleri Deal :  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते बिसलेरी कंपनीची विक्री करत आहेत. या डीलमध्ये टाटा (TATA) कंपनीचे नाव आघाडीवर होते. पण आता त्याबद्दल नवीन माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, टाटा-बिस्लेरी यांच्यातील करार अजूनही पूर्ण झाला नाही. त्यामध्ये अडथळे आले आहेत. कराराच्या मूल्यांकनाबाबत दोन्ही कंपन्यांमधील बोलणी रखडली आहेत.

बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य शेअर्स मिळविण्यासाठी टाटा समूहाला हा करार करायचा आहे. आता या डीलबाबत बातमी येत आहे की, डीलच्या व्हॅल्युएशनचे प्रकरण अडकले आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बिसलेरी आणि टाटा यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचली होती. दोन्ही कंपन्या व्यवहाराची रचना अंतिम करण्याचे काम करत होत्या, परंतु आता हा करार रखडल्याचे दिसत आहे.

बिस्लेरीच्या मालकांना या डीलद्वारे 1 बिलियन डॉलर मिळवायचे आहेत, परंतु ते टाटाकडून मिळणाऱ्या मूल्यांकनावर खूश नाहीत.

टाटा आणि बिस्लेरी यांच्यात पुन्हा नव्याने चर्चा सुरू होऊ शकते. त्याचबरोबर इतर संभाव्य दावेदारही यासाठी पुढे येऊ शकतात. हा करार झाला असता तर बिस्लेरी व्यवसायावर टाटांची पकड आणखी मजबूत झाली असती.

बाटलीबंद पाण्याच्या ब्रँड्समधील टाटाचा पोर्टफोलिओ मजबूत झाला आहे. टाटा कंपनीकडे हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा वॉटर प्लस सारखे ब्रँड आधीच आहेत.

रमेश चौहान यांना कंपनी विकायची होती :

बिस्लेरी विकली जाणार असल्याची माहिती पहिल्यांदा सप्टेंबर 2022 मध्ये आली होती. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुमारास टाटा समूह बिस्लेरी इंटरनॅशनलमधील भागभांडवल विकत घेणार असल्याची बातमी आली.

ही डील 7000 कोटी रुपयांना होणार होती. रमेश चौहान यांनी सांगितले होते की, त्यांची मुलगी जयंती चौहान हिला या व्यवसायात फारसा रस नाही, त्यामुळे त्यांना ही कंपनी विकायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Ganesh Kale Case: Vanraj Andekarचा बदला Ayush Komkar नंतर गणेशला संपवला, टोळीयुद्ध पेटलं.. | Sakal News

Solapur Politics: 'भाजप माेहिते-पाटील यांना बालेकिल्ल्यातच घेरणार'; कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांचा पत्नीसह शुक्रवारी पक्षप्रवेश..

SCROLL FOR NEXT