tata group company tata motors turns net debt free in fy24 share finance Sakal
Personal Finance

Tata Motors : टाटा मोटर्स आर्थिक वर्ष २०२४ मध्ये संपूर्णपणे कर्जमुक्त कंपनी

टाटा मोटर्सने आज विविध विभागांबाबतच्या आगामी योजना आणि अंदाज जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

Tata Motors : टाटा मोटर्स आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कर्जमुक्त झाली असून, तिची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. सर्व व्यवसाय स्वावलंबी असून, गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला जातो, असे आज टाटा मोटर्सने जाहीर केले.

या घोषणेमुळे टाटा मोटर्सचा शेअर ९६६.७५ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून आज २.५ टक्क्यांनी उसळले. टाटा मोटर्सने आज विविध विभागांबाबतच्या आगामी योजना आणि अंदाज जाहीर केला. व्यावसायिक वाहन क्षेत्राच्या बाजारहिश्शात स्थिर वाढ आणि कमाईच्या वाढीसह बाजाराला मागे टाकण्याचे उद्दिष्ट आहे,

तर प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात बाजारातील वाढीच्या अंदाजांना मागे टाकून वित्तीय वर्ष २०२७ पर्यंत १६ टक्के आणि पुढील दोन ते तीन वर्षांत १८ ते २० टक्के हिस्सा मिळवण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात टाटा मोटर्सने आपले नेतृत्व टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले असून, आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ३० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

टाटा मोटर्स, १५० अब्ज डॉलरच्या टाटा समूहाचा एक भाग आणि ४४ अब्ज डॉलरची कंपनी आहे. टाटा मोटर्सने मे २०२४ मध्ये, एकूण ७६,७६६ वाहनांची विक्री केली असून, मे २०२३ मधील ७४,९७३ वाहनांच्या तुलनेत त्यात अल्प वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक मोटारींसह देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री दोन टक्क्यांनी वाढून ४६,६९७पर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT