Ratan Tata  Sakal
Personal Finance

Tata Group: टाटा समूह स्वतःच्याच कंपनीचा विकलेला हिस्सा परत खरेदी करणार? हालचाली सुरु

Tata Group: टाटा समूहाने कंपनीसोबत याबाबत चर्चा सुरू केली आहे.

राहुल शेळके

Tata Group: टाटा समूह त्यांची मनोरंजन प्लॅटफॉर्म कंपनी टाटा प्ले मधील टेमासेक होल्डिंग्ज कंपनीला विकलेला हिस्सा परत घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. टाटा समूहाने टेमासेकसोबत चर्चा सुरू केली आहे.

या अंतर्गत टाटा समूह टेमासेकला गुंतवणूकीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव देणार आहे. टेमासेकने 2007 मध्ये गुंतवणूक करून टाटा प्लेचा 20 टक्के हिस्सा विकत घेतला होता. त्यानंतर कंपनीचे नाव टाटा स्काय झाले होते, जे नंतर बदलून टाटा प्ले करण्यात आले.

आता टाटा समूह सिंगापूरच्या टेमासेक होल्डिंग्स पीटीई कंपनीशी टाटा प्लेमधील 20% हिस्सा परत खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. या करारामुळे टाटा प्लेचे मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होऊ शकते.

या डीलची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा टाटा प्ले आपला IPO लॉन्च करण्याच्या विचारात आहे. यासाठी सेबीची मंजुरी फार पूर्वीच मिळाली होती मात्र तरीही कंपनीकडून दिरंगाई होत आहे.

टाटा समूहाची आणखी एक कंपनी Tata Technologies चा IPO लॉन्च होणार आहे. आतापर्यंत या IPO ची लॉन्चिंग तारीख आणि इश्यू किंमत यासह इतर तपशील कंपनीने दिलेले नाहीत. टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ 18 वर्षांनंतर येईल. 2004 साली टाटा समूहाची कंपनी TCS चा IPO लॉन्च करण्यात आला होता. यानंतर अजून कोणताही IPO लॉन्च केला नाही.

ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की टाटा ग्रुप आणि सिंगापूरची कंपनी टेमासेक या डीलसाठी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. टाटा प्ले हा टाटा समूह आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी फॉक्स इंकचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनीचे भारतभर 23 दशलक्ष कनेक्शन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT