TATA Group Taj Resorts in Lakshadweep Sakal
Personal Finance

TATA Group: भारत मालदीवच्या तणावादरम्यान टाटांचा मोठा निर्णय; लक्षद्वीपमध्ये बांधणार 2 रिसॉर्ट

TATA Group Taj Resorts in Lakshadweep: टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदमत या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केला आहे.

राहुल शेळके

TATA Group Taj Resorts in Lakshadweep: टाटा समूह लक्षद्वीप या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील सुहेली आणि कदमत या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने अलीकडेच या दोन बेटांवर ताज ब्रँडचे दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी करार केला आहे.

हे रिसॉर्ट्स 2026 मध्ये सुरू होतील. हे दोन्ही रिसॉर्ट स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जातील. सुहेली आणि कदमत बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी, पांढर्‍या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

राजकीय तणावादरम्यान धोरणात्मक पाऊल

लक्षद्वीपला भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. विशेषत: भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. (A strategic move amid political tensions)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीच्या आवाहनामुळे मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताविरोधात वक्तव्ये केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

ताज सुहेलीमध्ये 60 बीच व्हिला आणि 50 वॉटर व्हिलासह 110 खोल्या असतील. तर ताज कदमात 110 खोल्या असतील ज्यात 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिला असतील.

लक्षद्वीप व्यतिरिक्त, IHCL ने उत्तर प्रदेशातील दुधवा येथील सिलेक्शन हॉटेल जागीर मनोरसह पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

वाद कसा सुरू झाला?

पीएम मोदींनी 4 जानेवारीला त्यांच्या लक्षद्वीप भेटीचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर लोक सोशल मीडियावर म्हणू लागले की मालदीवला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले आहे. (How did the controversy begin?)

त्यामुळे मालदीवचे मंत्री आणि नेते संतप्त झाले. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीव नागरिकांमध्ये युद्ध सुरू झाले. भारतातील लोकांचा संताप इतका वाढला की देशात #BoycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

लोकांनी मालदीवला प्रचंड विरोध करायला सुरुवात केली. पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT