Tata -Hindustanpetroleum Agreement
Tata -Hindustanpetroleum Agreement sakal
Personal Finance

Tata -Hindustan petroleum Agreement : टाटा-हिंदुस्‍तान पेट्रोलियमचा करार ; देशभरात ‘ईव्‍ही’ चार्जिंग सुविधेचा विस्तार करणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनच्या सुविधेचा विस्तार करण्यासाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.ने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) कंपनीशी एक सामजंस्य करार केला आहे. या करारानुसार, दोन्ही कंपन्या परस्पर सहयोगाने देशभरात सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे जाळे वाढविणार आहेत. टाटा ‘ईव्ही’ मालकांद्वारे वारंवार भेट दिल्या जाणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपांवर ‘ईव्‍ही’ चार्जर्स स्थापन केले जाणार आहेत. देशातील अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दोन्ही कंपन्यांनी हा पुढाकार घेतला आहे.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर बालाजे राजन म्हणाले, ‘‘दोन्ही कंपन्या एका को-ब्रॅंडेड ‘आरएफआयडी’ कार्डामार्फत सोयीस्कर पेमेंट पद्धत आणण्याचाही विचार करत आहेत. त्यामुळे चार्जिंगचा अनुभव अधिक सुलभ होईल. पेट्रोलपंपावर चार्जरच्या वापराबद्दल माहितीही नोंदवून घेतली जाणार आहे, जेणेकरून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यात मदत होईल.’’

‘एचपीसीएल’च्या रिटेल स्ट्रॅटेजी विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देबाशीष चक्रवर्ती म्हणाले, ‘‘देशातील ईव्ही बाजारपेठेत टाटांचा हिस्सा ६८ टक्के आहे, तर‘एचपीसीएल’चे देशभरात २१,५०० पेट्रोलपंप आहेत. ‘एचपीसीएल’ने देशभरात एकूण ३,०५० ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित केली असून, यात बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचाही समावेश आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत ५,००० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी’च्या सहकार्याने चार्जिंगची अधिक मागणी असलेल्या भागातील पायाभूत सुविधा वाढवता येतील आणि त्यायोगे ‘ईव्ही’ ग्राहकांना चार्जिंगबद्दल वाटणारी चिंता कमी करण्यात मदत करता येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT